रेन ट्रीच्या झाडांवर लांबून पाहताना लुकलुकणार्या दिव्यांसारखी दिसणारी तुर्रेदार फुलं ऐटीत झाडांच्या टोकांवर पाणदिव्यांसारखी तरंगत असल्याचा भास होतो....शिरीषाच्या झाडाची एक कमाल वाटते मला, मंद रंगाच्या गुलाबी झुपक्यांनिशी त्याच्या वेंधाळ फांद्या वार्यानिशी हलतात तेव्हा कुठे त्याची फुलं पटकन नजरेत येतात. एरवी आकर्षून घेणारा रंग,पाकळ्या असा अलंकारिक जामानिमा नसला तरी शिरीष फुलांचं असणं निव्वळ आवडतं. साने गुरुजींच्या बालकथांपैकी एका पुस्तकात शिरीषाच्या फुलांचा एक छान संदर्भ होता...तेव्हापासून आजतागायत शिरीषाच्या फुलांचं आकर्षण तस्संच आहे. त्याच्या सावलीतच बसलेल्या असतात त्या दोघी. भुर्या रंगाचा पिनाफोर आणि त्यात त्याहून जरा फिक्कट शर्ट तो ही निळीच्या रंगाने निळकट झालेला...निळसर मळकट अशीच झाक आहे त्या रंगात. त्यांच्या रंगात बेमालूम मिसळून गेलेली. भुरकट केसांच्या घट्ट वेण्यांना काळ्या रिबीनी आणि फुलपाखरी पेड. एक जराशी सावळी दुसरी गव्हाळ. भेळेच्या पुडक्यात एकच ओलसर पुरी बुडवून खात, खिदळत त्यांची दुपार सटकते. एकाच शाळेतल्या-आळीतल्या मैत्रिणी..,दोघी शाळा सुटल्यानंतर ठराविक घरातली दुपारची काम...
Posts
Showing posts from 2009
तात्या
- Get link
- X
- Other Apps
आज्यो...बाssss', आज्योssबा’ कितीतरी वेळ आज्यो मधल्या ’ज्यो’ वर एक इनोसन्ट गिरकी घेत माझ्या अगदी समोर उभ्या असलेल्या माणसाच्या खांद्यावर त्याचं आजोबा पुराण चाललेलं. ठेक्यात चार पाच वेळा त्याच्याकडून आबोजा-बिबोजा असं कौतुक करुन घेतल्यावर आजोबानेही कपाळावरचा घाम पुसला. बराच वेळ त्याच्याकडे बघत बसल्यावर नंतर मलाही गरम व्हायला लागलं. ’काय पण जागा मिळालीये गुंफा बांधायला...’टेकडीवर चढून बांधायची ना..’ असा माझा मूक वैताग चाललेला. गुंफा बांधायच्या, म्हणजे फक्त बांधून ठेवायच्या...डागडुजी करण्याच्या नावाने बोंब..पलीकडे ताटाएवढ्या भोकातून गळती सुरु, वावर नाही तिथे शेवाळं हौसेने वाढलेलं...नवरात्र, महाशिवरात्रीला हीssssss गर्दी. ’पुष्कळ जुन्या म्हणजे २००-३०० वर्ष जुन्या असतील नाही का’...कुणी म्हणायचा अवकाश लोकांचं पुढचं वाक्य असतं’ पांडवकालीन’ आहेत’.. ????????? २००-३०० वर्ष जुन्या पांडवकालीन कशा असतील.... बरं असल्याच तर पांडव इथे राहून गेले म्हणून प्लीज सांगू नका...जिथे जावं तिथे हेच ऐकावं पांडव अज्ञातवासात असताना इथे होते......अर्रे....याला काहीतरी प्रमाण? असं विचारायला जावं तर पुढचं उत्त...
बाल्कनी : २
- Get link
- X
- Other Apps
गजा काकू म्हणजे ठेवल्या नावाला वजनानिशी जागणारी बाई! काकूंची दृष्टी अलौकिक, गजाआडच्या सृष्टीचा अंदाज घेणारी. "बाल्कन्यांवर भारी नजर या बाईची, नवीन साडी आणून वाळत घालायची खोटी..यांना कळलंच!" इति नवरत्ने. "इतनीभी बुरी नहीं है गजाजी।" इति सोनी. (सोनींना सोसायटी आणि सोसायटीला सोनी नवख्या होत्या त्या काळापासूनची त्यांची गजाकाकू ही मैत्रिण. त्यामुळे तसा त्यांचा काकूंबाबतीत सॉफ्ट कॉर्नर होता.) "मामींचं नाक काय तीक्ष्ण आहे हो..परवा मी हे टूरवर जाणार म्हणून कडबोळ्या करायला घेतल्या, आपसूक बातमी लागल्यासारख्या ह्या आल्या..म्हणे शिल्पे खमंग वास येतोय बाल्कनीतून. आज काय निलेशराव स्पेशल वाटतं..., मग रेसिपी लिहून घेउन, चार टेस्ट करण्यासाठी म्हणून घेउन गेल्या. खूप छान झाल्यायत म्हणाल्या." शिल्पा-निलेश सोसा.तलं नवदाम्पत्य..शिल्पा त्यांना आवर्जून मामी म्हणते.(अजूनही). "सुनंदे, मेले डोळे आहेत की फुंकणी? जाळ काढशील बघता बघता..." इति बेळगावची म्हातारी. तिला एकटीलाच फक्त काकूंना अशा प्रकारे बोलण्याची सवलत होती. त्यामागचं गुपित-गोटाकडून कळलेलं कारण म्हणजे..बेळगावच्या उ...
बाल्कनी : १
- Get link
- X
- Other Apps
’बाल्कनी’ म्हणजे बाल्कनी ! बैठ्या सोसायटयांमधल्या घरकर्यांचा जीव की प्राण, म्हणजे जीव गेला तरी प्राण बाल्कनीत शिल्लक असं काहीसं बाल्कनी उर्फ गॅलरीचं पूर्वीचं ग्लॅमर. त्यातली मानाच्या गणपतीसारखी ’मानाची गॅलरी’ म्हणजे ’डी’च्या रुमची गॅलरी. ऐसपैस, मोकळीढाकळी सेम सोसायटीतल्या बायकांसारखी. तशी सोसायटीतल्या प्रत्येक घराला बाल्कनी, पण ती पुढे-मागे असण्यातली गोम फक्त सोसायटीकरांनाच ठाउक. हाउसफुल्ल शो चं तिकीट काढताना नाटक आणि सिनेमा यातली गल्लत बराच काळ चुटपुट लावू शकते तशीच जागा घेताना बाल्कनी पुढे-मागे असण्याचं महत्त्व लक्षात घेतलं नाही तर आयुष्यभराची खंत गॅलरीत पुरून जगावं लागतं. बाल्कनीच्या घराचं प्रेस्टीज फार...म्हणजे ’विवाह नोंदणी कार्यालयाने ’मुलगा स्वतंत्र नाही पण राहत्या घराच्या बेडरुम सेपरेट’ अशी’ आकर्षक’ ऍड द्यावी तसं सोसायटीकरांनी उपवर मुलीच्या पित्याला ’आमची ’डी’ची रुम, विथ अटॅच्ड बाल्कनी/बाल्कनी अटॅच्ड’ असं सांगून उपकृत करावं. गॅलरीवर लोकांचं असं प्रेम!! एवढं की शेलाटेंसारख्या अभिमानी मध्यमवर्गीय माणसाने संपूर्ण आयुष्यच गॅलरीत ’संगणकी शिकवण्या’ घेत वेचलं. तर सांगायची गोष्ट ही की...
देठाफुलाची गोष्ट
- Get link
- X
- Other Apps
आमचा विभू म्हणजे अगदी छोटं छोटं गोरंपान बाळ होतं तेव्हा... त्याला मांडीवर घेउन गप्पा चालल्या होत्या आमच्या, म्हणजे त्याला फक्त ही ही हु हु, आणि फारतर फार जोरात रडता येत होतं, आणि मला एखाददुसरी अंगाई म्हणता(ऐकवेल इतपत गोड आणि गायला सुरु करायचा अवकाश फार काळ अंत न बघता त्याला पटकन गुडुप्प झोप येईल अशी) येत होती. त्याचा बोलण्यासाठी प्रयत्न मात्र सुरु झाला होता. काहीतरी बघून खुद्कन हसण्याचेही खेळ चालले होते. अचानक त्याच्या तोंडून बोबडी हाक ऐकली....आणि दोन सेकंद कानांवर विश्वासच बसेना. तश्शीच टुण्णकन उडी मारुन धावत आईला सांगायला गेले. "आई, विभूने हाक मारली ती ही माझं नाव घेउन, hehhe ’आई’ म्हटलंच नाही आधी त्याने..टुकटुक..मज्जा." आईलाही ऐकून गंमत वाटली होती. आम्ही म्हणजे काय आसमंतातच....कुणी अभ्यास बिभ्यास न करता डॉक्टरेट दिल्यासारखा आनंद झाला होता. आपण काय म्हटलं हे त्याला कळण्याची सोयच नव्हती. तो आपला मस्त सतरंजीचं एक टोक तोंडात पकडून माझ्याकडे पाहून हसत होता. यानंतर एक आठ नउ वर्षांनी..... . . . . आमची नेहमीसारखीच उतास जाईल इतकी वादावादी ऐकून आई वैतागली होती. "काय चाललंय तु...
- Get link
- X
- Other Apps
सकाळी भरभर कामं उरकून आई घराबाहेर पडली, तिच्या जाण्याच्या वेळा हल्ली हल्लीच अनिश्चित व्हायला लागल्या. घरातली सगळी कामं उरकता उरकता दमछाक होणं हा काय प्रकार असू शकतो ते घरात स्वत: बिनकामाचे पडलेलो असल्याशिवाय कळण्याचा प्रश्नच उद्भवत नसतो. एरवी कॉलेजची बॅग लटकवून मी आणि नंतर शाळेचं ओझं घेउन विभू घरातून बाहेर पडतो, आपल्याच विश्वात रममाण होण्यासाठी. मागे उरते फक्त आई......घराबाहेरचं आपलं असं एक रुटीन सुरु झालं की आपल्या मागे घरी उरणा-या माणसाच्या कामाबद्दल फक्त कल्पना केल्या जाउ शकतात किंवा अंदाज बांधले जाउ शकतात. म्हणजे शेव-पुरी,पाव-भाजी किंवा पिझ्झा असे नॉट सो कॉमन मेन्यू संध्याकाळच्या जेवणात मेन आणि फायनल लिस्टवर असतील तर त्याच्या तयारीपासून अर्थात सगळ्या गोष्टी तीच करते( कारण मला वेळ नसतो, घरी असले तरी इतर बर्रीच कामं म्हणजे.. ऑरकुटींग-टॉरकुटींग...कालच भेटून झालेलं असलं तरी आज कमीत कमी १५ मिनीटं फोनवर मारण्यासाठी विषय असू शकतात इ. इ. ). ती मात्र तिच्या कामाशी १००% डेडीकेटेड असू शकते कधीही,केव्हाही......थोडक्यात आई ही ग्रेटच असते. :) मास्टर्स च्या ऍडमिशनमुळे या सगळ्या रुटीनमध्ये एक खंड ...
- Get link
- X
- Other Apps
रोज काही नवीननवीन(त्याही चांगल्या) पोस्टस सुचत नाहीत...पण तरीही काहीतरी लिहावंसं वाटतं, रोज घडेल ते सगळंच इंटरेस्टींग नसलं तरीही.....म्हणून एक नवीन ब्लॉग सुरु केला. अर्थात त्यामागची आयडिया/ कल्पना ही इतर ब्लॉग्स पाहूनच सुचली..अमलात आणावीशी वाटली. तेव्हा सर्किट, कोहम, जास्वंदी यांना थॅक्स :) http://sadaaphuli.blogspot.com/
ही वाट दूर जाते
- Get link
- X
- Other Apps
पाठोपाठ दोन सलग आठवडयांनी कंटाळ्याला ऊत आणला की मी समोरच्या रस्त्याचं टोक पकडून सुसाट चालत सुटते. घराच्या खिडकीतून डोकावून पाहिल्यावर रेंगाळलेला रस्ता दिसतो.....रस्त्यावर उभं राहिलं की डाव्या हाताला लागूनच एक मोठ्ठंच्या मोठ्ठं खाजण पसरलंय....वेडया -वाकडया, खुरटया कशाही वाढलेल्या खारफुटी आणि पलीकडे उंच बिल्डिंग्झची एक आडवी रांग.... मागे मान वळवून पहावी तर कंपाउंड वॉलच्या आत गच्च गर्दीत, सुपारीच्या झावळ्यांची मिट्ट दाटीवाटी आणि त्यात हरवून गेलेली खिडकी...... त्यातल्या त्यात लक्षात राहतात त्या पोफळीच्या झाडांवरच्या पांढुरक्या रेषा, मध्यावर ठळक आणि पायथ्याशी पुसट होत गेलेल्या....वरच्या अंगाला त्यातूनच फुलून आलाय की काय असं वाटायला लावणारा हिरवाकंच पोफळीचा गाभा.....त्यातून बारीकसे तुरे आणि छोटी फळं दिसायला लागलीयेत...... पुढे पुढे जाताना मिचकुडया निऑन लाईट्सचा प्रकाश आळशासारखा वरच्या वरच झाडांवर पसरुन तेवढाच भाग सोनेरी होउन लखलखतो.....उतरतीला वाकून रस्त्याकडे झेपावणा-य़ा त्यांच्या फांद्या....आता पाउस सरसरेल तशा तरारुन वर येतील.... याच रस्त्याचं बोट धरुन पुढे चालावं तर तोंडापाशी येताच ...
पत्र लिहिण्यास कारण की......
- Get link
- X
- Other Apps
"तुझ्या कानात कूsssss कलू?????" एक वेलचीचा टाका वर घेउन मी वर बघण्याच्या आत, कानाजवळ एक गुदगुली झाली....पण त्या सरप्राईजच्या खटाटोपात बोटातून ती हिरवी गुंडाळी खाली पडली...क्षणार्धात ती उचलून परत फुलपाखरासारखी बोटं गुंफून कानाजवळ........यावेळी मात्र जोरात शीळ या टोकातून त्या टोकाकडे गेली. चिमुकल्या आनंदात गालावर एक लब्बाड हसू उमटलं होतं. "कान दुखला ना माझा...बघू काय आहे ते?" काय असेल?? यू वोन्ट बिलिव्ह अर्चन,.........’पिंपळाचं पान’,...त्याचं बारीक वेटोळं करुन फुंकर घालून शीळ घालण्याचे उद्योग चालले होते. "कुणी शिकवलं हे?? काय काय करत असतेस ठमे तू...." त्यावर ओठांचा नाजूक चंबू झाला... "वासूसू..sssss ने." माझ्या भुवया नकळत वर गेल्या. "आजोबा.....आजोबा म्हणायचं त्यांना, वासू नाही...काय?" बाजूच्याच खांबावर गिरक्या घेण्याचा कार्यक्रम सुरु झाला...लक्ष नाहीये आपलं असं सुचवत. मग मीही माझा हेका सुरु ठेवला. गिरकीसरशी तिचा एक हात बाहेर झेपावला तोच पकडून तिला पुढे आणलं...आणि दोन्ही हात एकात बांधून विचारलं... "काय म्हणायचं मनू....?" बारीकशा प...
विसावा
- Get link
- X
- Other Apps
"आई, आपल्याला गाव का नाहीये?" "अगं गाव नाहीये असं नाही, पण आता तिथे कुणी रहात नाही." "पण का राहात नाहीत, सगळे सुट्टीत गावाला जातात , माझ्या सगळ्या मैत्रिणी जातात....आपणच जात नाही." "तुझं घर आपण कोकणातच घेउ, मग तर झालं?" "पण आत्ताची मजा तेव्हा येईल का?" "बरं एक काम करु...आपण या सुट्टीत खानवलीला जाउन येउ...मामाला सांगूयात तसं." "तुला गाव आहे?" "हो......आम्ही भरपूर धमाल केलीय अगं लहानपणी. मी आणि दादा मामा.....काय काय नाही केलंय ते विचार. तुला आणि विभूला नेउन आणू." "पण मग तू एवढे वर्ष का गेली नाहीस परत?" "अगं लग्नानंतर जाणं झालंच नाही, पण आता जाउ...." "हं...." "बघ हो, पण गावाला पाणी नसतं हल्ली....लाईट्स जातात बर्याचदा." "बघू ते आपण नंतर......आधी मला जायचंय तिथे." पाच वर्षांपूर्वी आयुष्यात पहिल्यांदा गावाला जाउन आले...ती गावाची पहिली आणि आतापर्यंत शेवटची ओळख. आठवणी मात्र अजूनही ताज्या....... ’कारने जाताना दुरून दिसणारी रोपं, मधूनच दिसणारा पिवळ्या फुलांचा गच...
झहीर
- Get link
- X
- Other Apps
नुकतंच पॉलोचं ’द झहीर’ वाचलं. अल्केमिस्ट सारखाच स्पिरिच्युअल टच झहीर ला ही आहे. हा त्याच्या पुस्तकांचा स्थायी भावच असावा. मुळात लेखनाची आवड असलेला पण अपघाताने एका गायकाशी भेट झाल्यानंतर प्रसिद्ध लिरिसिस्ट म्हणून नावाजलेला ’तो’, फ्री मॅन संकल्पनेला महत्त्व देणारा पण नेमकं फ्री असणं म्हणजे काय या गुंत्यात फसलेलं, त्याच्या पहिल्या दोन-तीन पण जास्त काळ न टिकलेल्या लग्नानंतर ’एश्थर’ बरोबर आठ वर्ष टिकलेलं नातं.............त्याच्या म्हणण्याप्रमाणे नवरा-बायकोतले कॉमन ओकेझनल वाद त्यांच्यात ही होतात पण तरीही एकमेकांचा सहवास त्यांना आवडतो..... आणि ’एश्थर’ म्हणजे एक जिंदादिल उत्साह, पत्रकार या नावापाठोपाठ येणा-या सगळ्या विशेषणांना अनुकूल , त्याच्या बेधुंद वागण्याबद्दल फारसा आक्षेप न घेणारी......... पण एका क्षणी, त्याच्या स्वत:वरच्या प्रेमाच्या कोषातून बाहेर पडण्यासाठी त्याला उद्युक्त करते...... ’सांतियागो’चा स्वत:च्या नाईलाजास्तव, केवळ तिच्या आग्रहापोटी सुरु झालेला त्याचा प्रवास त्याच्या नकळत एक वेगळाच ’तो’ त्याच्या समोर घेउन येतो............... आधी फक्त संगीत, शब्द आणि त्यातून आलेली प्रसिद्धी य...
:)
- Get link
- X
- Other Apps
कालपर्यंत जोशात असलेल्या क्रिएटिविटिने आज विश्रांती घेतली ;) काल दुपारी टकवलेलं टेमप्लेटही रात्री एडिट करुन नवीन लावलं. पण हे फायनल....यातली ’अ गर्ल इन विंड’ खूप आवडली. मागचं झाड जरा सायली किंवा प्राजक्ताचं असतं तो और क्या चाहिये था पण तरीही ते पसंतीस उतरलंय. नावही बदललं....’पत्र लिहिण्यास...’ लाडकंच आहे नो डाउट पण ते लेबल म्हणून मागच्या पोस्टस ना दिलं आणि ’मुक्तांगण’ वरती......... हिरवा, पोपटी रंग असतोच लई भारी बरं............ शिवाय मध्ये ’शुभ्ल पांधला’ (;) जम्माडी गम्मत :)
- Get link
- X
- Other Apps
आज काहीतरी नवीन करण्याचा झटका आला होता. सकाळी उठून घरात बसल्या बसल्या वेडगळ, सुखावह वाटणारे प्रकार करावेसं वाटणं.......त्यात कागद, पेन्सिल, पेन, जुने कलर्स, जुन्या पिशवीतलं क्राफ्टचं सामान....त्यातल्या चमचमत्या चांदण्या, पतंगाच्या आकाराचे लुकलुक आरसे, वेलवेट पेपर, बटर पेपर,हॅन्डमेड पेपर, काहीशा चुण्या पडलेला तरीही घडीत दुमडून ठेवलेला, ठिकठिकाणी सेलोटेप लागलेला डिझाईन पेपर, टिश्यू पेपर असा बराच मोठा खजिना हाताला लागला....पण ते करुनही स्टॅमिना न संपल्याकारणाने पीसीला हाताशी घेउन आता उद्योग करुयात असा विचार येताचक्षणी......पेंट, फोटोशॉप मध्ये जाउन लूडबूड केली. सरतेशेवटी ब्लॉगकडे आले. टेम्प्लेट चेंज करण्याचा विचार डोकावण्याचा अवकाश फाईनल्सेन्स वर जाउन दोन तीन टेम्प्लेट टकवली. पहिलं लावलं......ते फार साधं वाटलं...दुसरं एडिट केलं त्याचा कलर डार्क वाटला अशी बर्याचदा नाकं मुरडून कॉफीचं हे एक आवडलं. कोणत्या क्षणी मला काय आवडेल याचा भरवसा मला स्वत:ला देता येत नाही, दुसर्यांनी देण्याचा प्रयत्न तापदायक ठरतो. माझे मूड स्विंग्झ टिल डेट फक्त मलाच सांभाळता आलेत. त्यामुळे मला आपला ब्लॉगोबा आवडतो. त...
एक मुक्तछंद
- Get link
- X
- Other Apps
खूप दिवसांनी लिहायला बसलं की छानपैकी पूर्वीसारखी पेन्सिलीला टोक काढून, शार्पनरमधून बाहेर पडणा-या झिरमिळ्या( दुसरा कोणता शब्द त्याला आत्ता सुचत नाहीये) कंपास बॉक्स मध्ये जपून ठेवत, मग त्याचे शुभ्र कागदावर फुलांसारखे आकार चिकटवून...त्यांच्याकडे समाधान होईस्तोवर पाहून झालं की परत डायरीकडे मोर्चा. मान वाकवून नि मन लावून आउपेक्षा वळणदार अक्षर काढण्याचा एक अविरत प्रयत्न! पण हल्ली लिहायचं म्हटलं की मला धास्ती वाटते ती समोरच्या कागदावर कुठल्या मुक्तछंदात अक्षरं उमटतील याची. मराठीत लिहिण्याची सवय सुटल्यानंतर जे काही पिळ सुटलेल्या रबरासारखं लेचंपेचं अक्षर दिसतं ते पाहून परत हातात पाटी घेउन आपल्याला गिरवण्याची नितांत गरज आहे हे जाणवत रहातं. मग ती घनघोर निराशा पदरी पाडून घेण्यापेक्षा ब्लॉगवर लिहिणं किती सुखावह...एकाच टाकाची अक्षरं, मात्रा, काने. कुणी जाणूनबुजून खोट दाखवण्याचं कारणच नाही. दोन आठवडयांपूर्वी पुण्याला गेले होते दोन ईंटर्व्यूंसाठी. एरवी पुण्यात पाउल टाकलं म्हणजे सगळी अंगावर साचलेली धुळीची पुटं झटकून मन ताजतवानं होतं. इथल्या वेगवेगळ्या संस्कृतींचं लेणं मिरवून मिरवून कुठल्याही एका धड संस...
अवघे पंढरपूर
- Get link
- X
- Other Apps
शुक्रवारी संध्याकाळी कॉलेजच्या दिशेने पदयात्रा चालू होती....चालता चालता कटट्याजवळ आले नि एक संभाषण कानावर पडलं हे असं पुचाट मी काही म्हणणार नाहीये कारण मी भोचकपणे,जाणूनबुजून त्यांच्या नकळत त्या संभाषणात डोकावले होते . ज्युनियर्सची धमाल गँग असावी. "सगळे आले का रे कुंभकर्णा?" इति एक लाल टीशर्ट, tall dark n (handsome च्या थोडं जवळपास जाणारी पर्सनॅलिटी). "कुठे अजून, च्या मारी ह्या पोरींच्या........पूनम आयुष्यात वेळेवर येईल तर च्यायला घडयाळच जसं काही बंद पडणारे" इति ’ विस्कटलेला एक माणूस’. "बट शी इझ स्मार्ट, काहीही म्हण." "स्मार्ट नाही, आगाउ नंबर दोन........काल भेटायला सगळ्यांनी कुठे जमायचंय हे विचारण्यासाठी फोन केला तर ही बया म्हणते, ’संध्याकाळी ये, यमुनाबाई हिर्लेकर चौकात................ दात उचकटू नकोस रे ******, for that moment मला कळलंच नाही कुठल्या चौकात बोलावतेय ती. नंतर म्हणाली अरे आपल्या रुईयाच्या नाक्यावर रे................असं म्हणून ’खि:खी: खि’ करत तुझ्यासारखेच दात उचकटले तिने नंतर. मला सांग, सरळ कॉलेजच्या नाक्यावर ये सांगता येत नाही? खरंच म्हणत...
स्वान्त: सुखाय
- Get link
- X
- Other Apps
मने, तुला good morning!! विश करु की आपलं मराठमोळ्या बाण्यात ’शुभसकाळ’ वगैरे म्हणू? खरं तर यापैकी काही एक न म्हणता ’आक्षी झनझनीत श्या हानाव्याश्या वाटत्यात.’ ’पन ह्यो लक्शान बरं न्हाई आक्के’ म्हणून सभ्यतेचा कासोटा तितक्याच सलज्जपणे खोचून ठेवलाय. अश्शी बघू नकोस, ...खरंच! स्वप्नातच कुणीतरी गावरान पंच नाकावर ठेउन दिलाय आणि तेव्हापासून मेंदूला ज्या झिणझिण्या आल्यात...सकाळपासून असंच होतंय. ’पन काय उपेग? बघ ना, टायमाला काय बी सुचंना. परवा मी आणि दिपू बांद्रयाहून घरी येण्यासाठी निघालो. बसनेच जाउया काही रिक्षावर पैसे नकोत घालायला’ असं ठणकावून सांगितलं( अर्थात पलीकडच्या हाटेलात सांबार भुरकल्यानंतरच हा शहाणपणा दाखवला हे तुला म्हणून कंसात सांगतेय)...हं तर बस- स्टॉपवर उभे होतो...सवयीप्रमाणे दहा मिनिटं झाली तरी लाल बावटा दिसंना; पण ’BEST म्हणजे BESHHT’ चं भूत मानगुटीवरुन सुटंना. तेवढयात एक बाई रिक्षावाल्याला घेउनच पुढे आली..... "शेअर करें, स्टेशन जाना है ना? ३ रु. ही होगा।" मुकाटयाने रिक मध्ये बसलो. केसांचा सुटसुटीत बॉयकट, हातात मोठया तीन-चार बॅगा...त्यात मला प्रथम आणि फक्त दिसला तो केक......
अत्तर
- Get link
- X
- Other Apps
(कृष्णा कंप्लेन्ट करतंय की रे, तुला पत्र लिहून सोडलं नाही म्हणून...........तसं भाषेचं फार कष्टं देत नाही मी, मग घाल की काळजी.........चुलीवर म्हणते मी ;P) "बघ बघ, her smile is so cute" आणि पुस्तक खाली ठेउन पाहिलं, तर......काय जीवघेणं हसते रे ती ! ओठांच्या दोन्ही कडांना नाजूकशा खळ्या पडतात, बकुळीची फ़ुलंच दोन टोकांना ठेउन दिल्यागत. तिचं स्माईल 10.2 नी कसं मोठ्ठ होईल ते पहाण्यासाठी दोन दिवस कॅमेरा घेउन तिच्या मागेमागे होते पण ही ढिम्म हसली नाही नि आता.....पण आत्ता कॅमेरा हातात असता तरी क्लिक करावा हेच विसरुन गेले असते. " did you see her cat eyes ?" "मग....?" " I don't like it ." "मग..................काय बार्बीसारखे हवैत?? हं.................................................... तशी ओठ मुडपून हुंकार देण्याची सवय फ़ार त्रासदायक असते नै, तुला नवीन नसेल पण; ’पटलं की नाही पटलं’ हे ठामपणे सांगण्याच्या त्रासातून सुटका :D. अशा नसत्या सवयी आपण लावून घेतो आणि मग त्या ब्रँड होतात. तुला नाहीये एखाद्या वक्तव्यावर ठामपणे बोलण्याआधी डोळे मिटून घेण्याची सवय......
प्रिय आउस,
- Get link
- X
- Other Apps
प्रिय आउस, "काल महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुझ्या हातची खमंग थालीपीठं खायला मिळतील.....अशाच खुशीत आणि किचनमधून येणा-या वासासरशी मांजरीचं नाक लावून आत गेले आणि पाहिलं.....बाबा थालीपीठं करतायत आणि तू बाहेर.....फ़ायलिंग करत बसली होतीस तुझ्या जगावेगळ्या आवडत्या कामांपैकी हे एक. खरं सांगू का गं, काल तुझ्यापेक्षा बाबांच्याच हातून छान झाली होती थालीपीठं. भाजाणी केप्रचीच, पण थालीपीठं मात्र मला हवी तशी मस्त कुरकुरीत....ती मउ मउ खाणं म्हणजे बोळक्या तोंडाने उगीच उम्म्म्म केल्यासारखं वाटतं, त्याऐवजी ऐटीत आगाउपणा करत,दातांचं ऐक्य मिरवत दह्यात बुडवून खाण्यात कोण आनंद असतो ठाउक आहे? आणि बाबा म्हणजे अगदी, काठालाही हलक्या दाबाने बोटं फ़िरवून, मध्येच छोटी भोकं पाडून काळजीपूर्वक पॅनवर घालत होते...कारण तुझ्या सराईतपणे फ़िरणा-या हातांची थालीपीठांना सवय त्यामुळे आज अलगद तव्यावर पडून तेलात चुरचुरणा-या त्यांच्याकडे बघून गंमत वाटली. त्यातून ती बाबा करत असताना अजूनच. नुसती थालीपीठंच नाही तर गरम गरम मुगाची खिचडी, टोमॅटो राईस, फ़ुलके ही बाबांकडे आम्ही हट्टाने केलेली मागणी.....अगदी क्वचितच करतील पण ते अगदी मन ला...
उनाडी गंमत
- Get link
- X
- Other Apps
बरं कधीकधी सकाळी उठून मला walk ला जावसं वाटतं....रोज काय तेचतेच बघायचं?.....तोच सूर्य, तीच झाडं,तोच रस्ता मग मला बोअर होतं. सकाळ कशी......कधीतरी उठून तिचं वेगळेपण अनुभवावं,मस्त romantic वगैरे व्हावं, धुंदफ़ुंद कविता कराव्यात आणि दाट धुक्याचा झाडात साचून राहिलेला हिरवा सुवास घ्यावा,प्राजक्ताला आंजारुन-गोंजारुन घ्यावं, झुबकेदार होउन पायावर लोळणा-या उन्हाशी कुजबुजत रहावं, टवटवीत सकाळ अलगद उतरवून घ्यावी....हे सगळं करण्यात कधीतरीच मज्जा असते गं’ हे असं आउला सांगितलं तर म्हणाली, ’तुला रोज उठायचा कंटाळा येत नाही, त्याच घरी यायचा कंटाळा येत नाही हे नशीब माझं :D ’न चुकता सकाळी पाकात पिळून काढलेल्या रस्गुल्ल्यासारखं ’love you" आणि संध्याकाळी तोच रस्गुल्ला बासुंदीत बुडवून काढल्यासारखं ’miss u a lotttt' असं लाडे लाडे श्रीजा कसं बोलू शकते??? कंटाळा नाही येत रोज लाडिक बोलण्याचा तिला?’ "तुला काय problem आहे त्या बिचारीचा, बोलेनात का.....त्या बंबूलाही आवडतं नं ते मग सोड ना" ......इति कविता. हे प्रकरण नवंनवं असणार म्हणून हे असं....अशी माझी आपली आधी समजूत होती पण कविने सांगितलं हे अगं...
रात्रमयुरा..
- Get link
- X
- Other Apps
दिवसातले गोंधळ, त्यांना दारापर्यंत निरोप देउन मी रात्रीच्या हक्काच्या जगात प्रवेश करताना कसं मोकळं मोकळं वाटतं......कित्ती दिवसांनी आउचा मोबाईल गवसला.....तिच्या नकळत उचलून आणलेला नाहीतर तिने बघितलं की हे रात्री कानात घालून मी गाण्यांच्या वरातीत होते तर तिच्या रागाचा पारा थेट वर जातो. आणि....’काढ ती कानातली टोपली(ear phone's ना याहून चांगला शब्द मी अजून शोधतेय म्हणजे तिला सांगता येईल)..दोन-दोन तास कानात अडकवून कानांच्या जवळ ठेउ नको कितीदा सांगितलंय खाजणं होतील कानाची" :O (कानाची खाजणं???) आउचा रागाचा पारा चढला की ती मराठीत गावरान सुटते....कुठल्याही अक्षरामागे कुठलंही अक्षर स्टॅंप लावून पाठवून देते...शब्द भिरभिरल्यासारखे इकडून-तिकडे पळत सुटतात. शाळेचे सुंदर, एकवळणी हस्ताक्षरातले,कौतुकं मिरवणारे अहवाल लिहीणारी ही तीच आउ का? असा मला प्रश्न पडतो. मग तिच्यासमोर मी नि विभू दाताच्या फ़टीत कोंबता येईल तितकं हसू कोंबतो आणि तिची पाठ वळायचा अवकाश खि:खी:खि:खी:.... तिच्या शब्दांची वेगळी डिक्शनरी तयार होईल’आउझ डिक्शनरी’ ( जसं चाउस तसं आउझ) :D पण आउला कुठाय ठाउक गाण्यांबरोबर माझे विचारही माझ्य...
चिरागदानं
- Get link
- X
- Other Apps
ब्लॉग सुरु केल्यापासून, हावरट मुलासारखं मिळतील तेवढे सगळे ब्लॉग्स पाहून टाकले...वाचून झाले. एकदम आईस्क्रीम, टॉफ़ीझ,चिंचा,खेळणी एकत्र मिळाल्यावर छोटया पिल्लूचा चेहरा कसा हरखून जाईल नं तस्संच झालं. नुसते ब्लॉग्स नाहीयेत हे........ही चिरागदानं आहेत!!! चिरागदानं हा शब्द पेशवाईतला.....झुंबरांसाठी किंवा पूर्वीच्या काळी जी महाल प्रकाशित करण्यासाठी छताला लागून दिव्यांची काचेतली आरास असे त्यांना चिरागदानं म्हणतात. ही सुद्धा मनातली चिरागदानंच नाही का? मनातल्या खोल,गूढ दालनात अधांतरी पाय ठेवावा आणि नंतर ही सुबक लेणी नजरेस पडून हरखून जावं असं काहीसं झालं माझं.....मनातली सरसहून सरस शिल्पं...काही सुबक, कोरीव शब्दनशब्द टिपून घ्यावा, तर काही अगदी आकार नसलेली पण वेडुकली तरी त्यांच्याशिवाय काहीतरी रितं राहिल्यासारखं वाटावं अशी.... गायत्रीचं लेखन....श्रीमंत करुन जाणारी भाषा, शब्दांचे चकवे, अनपेक्षित हळवेपण आणि नेमक्या क्षणी उंची गाठण्याची कला...सुंदर!! टयुलिपची वर्णनात्मक ओघवती स्टाईल...तिच्या दैनंदिनीत कुठेतरी स्वत:लाच पाहिल्याचे आभास करुन देते. संवादिनी सुमेधा, मंजिरी,....असे कित्येक आणि तरी अजून मुलांच...
- Get link
- X
- Other Apps
उगीच अस्फ़ुटपणे माझी फ़ुटणारी मी तुला ठाउक आहेच...पण माउ गं, डोशावरल्या वरवर पडणा-या कधी खरपूस वास सुटलेल्या जाळीसारखं होतं बघ माझं कधीकधी..निसतं उन उन पसरावं तसं कढलोण्यासारखं मी पसरत जावं आणि मग विरघळल्यागत एकजीव होउन जावं स्वगताशी. खिडकीवर हलत राहतं उन, त्यातली उबदार झुळूक कुठं आतआत जाउन भिडते...शब्दांच्या वेणांसारखी आतवरच खोल पडून राहाते. धूळ साचलेल्या पानावर बरोब्बर मध्येच तुकतुकीत छोटी पालवी धुमारते....मग जुनी पालवी गळून का पडत नाही....की आपलं गर्द हिरव्या पानातून पोपटी कोवळेपण उठून दिसतंय म्हणून झाड काही निरोपाचे दिवे घेत नाही. केशराच्या काडयांनी सजवलेल्या घट्ट खरवसाच्या वडीची आठव येते गं..आजी आत्ता येउन हातावर ठेवेल अन भरभरुन आशिर्वाद देईलसं वाटतंय....माघीच्या दिवशी भजनं ऐकली आणि लख्खं चकाकणा-या गणपतीच्या सोंडेवरलं फ़ूलंच होउन जावंसं वाटलं. मी वेळ नाही म्हणता म्हणता गार फ़रशीवर पाय टाकला आणि मग कळलं त्यादिवशी माघी चतुर्थी होती....कसं योगायोगाने पोहोचले नि तिथलीच झाले. जिंकल्या शुभंकर शक्ती....पण मी भांडलेच नव्हते कधी माझा विश्वास नाही म्हणत.....आस्तिक आणि नास्तिकाच्या खोल मृग...