स्वान्त: सुखाय


मने,
तुला good morning!! विश करु की आपलं मराठमोळ्या बाण्यात ’शुभसकाळ’ वगैरे म्हणू? खरं तर यापैकी काही एक न म्हणता ’आक्षी झनझनीत श्या हानाव्याश्या वाटत्यात.’ ’पन ह्यो लक्शान बरं न्हाई आक्के’ म्हणून सभ्यतेचा कासोटा तितक्याच सलज्जपणे खोचून ठेवलाय. अश्शी बघू नकोस, ...खरंच! स्वप्नातच कुणीतरी गावरान पंच नाकावर ठेउन दिलाय आणि तेव्हापासून मेंदूला ज्या झिणझिण्या आल्यात...सकाळपासून असंच होतंय.
’पन काय उपेग? बघ ना, टायमाला काय बी सुचंना. परवा मी आणि दिपू बांद्रयाहून घरी येण्यासाठी निघालो. बसनेच जाउया काही रिक्षावर पैसे नकोत घालायला’ असं ठणकावून सांगितलं( अर्थात पलीकडच्या हाटेलात सांबार भुरकल्यानंतरच हा शहाणपणा दाखवला हे तुला म्हणून कंसात सांगतेय)...हं तर बस- स्टॉपवर उभे होतो...सवयीप्रमाणे दहा मिनिटं झाली तरी लाल बावटा दिसंना; पण ’BEST म्हणजे BESHHT’ चं भूत मानगुटीवरुन सुटंना. तेवढयात एक बाई रिक्षावाल्याला घेउनच पुढे आली.....
"शेअर करें, स्टेशन जाना है ना? ३ रु. ही होगा।"

मुकाटयाने रिक मध्ये बसलो. केसांचा सुटसुटीत बॉयकट, हातात मोठया तीन-चार बॅगा...त्यात मला प्रथम आणि फक्त दिसला तो केक.....बाकी दिपूच्या म्हणण्याप्रमाणे पार्टीचं सामानही होतं, रिक्षात बसल्यावर तिने एकदा तिनं स्माईल दिलं......वरच्या पंक्तीतल्या सोळा जणांनी अंमळ जास्तच पाय सैलावलेले ;P

आता तिला शॉर्टकट माहिती होता....ठीक आहे पण म्हणून रिक्षावाल्याचं डोकं खायचं? त्यात ’ट्रॅफिक ज्याम’मध्ये दहा मिनिटं रिक्षा थांबली....’डोचक्याचा पार ईस्कोट झाला राव’.....आणि तीन ऐवजी सात रुपये भरावे लागले ती गोष्ट वेगळीच. असं वाटलं तिला तेव्हाच्या तेव्हा( आत्ताच्या आत्ता चं तिसंरं रुप) तीन ऐवजी सात का लागले विचारुन गर्भगळित करुन टाकावं.....पण कसलं काय तिथे माझाच गर्भजोमाळित संकोच मध्ये आला. मोक्याच्या वेळी अशी नव्वदीच्या वर नि सेंचुरीच्या आत रन आउट होण्याची माझी परंपरा आहे.

हल्ली योगा ईफेक्ट जाणवतोय....जाणवतोय म्हणजे कधी कधी, अगदी कोणकोणत्या वेळी........... ह्याच तिखट-मीठ चोळून सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. वेल च्या ग्रुपबरोबर चौपाटीला गेले होते तिथे पाणीपुरी वर फालुदा, मध्येच चायनिज खाताना सेकंदा सेकंदाला मी आत्ता ’विपरीत करणी’ केली तर काय होईल असे विचार मनात येत होते...ह्याला म्हणतात खरी साधना. ’डॅश डॅश बाबा’ की जय हो!!
रिक्षातून येताना सोसा. तल्या रतन काकू भेटल्या.....त्यागाची उचकी येउन सगळे पैसे म्याच पे केले.

असो. बघ, प्रतिभेची वांती लई डेंजरस......चार शबुद खरडल्यावर बरं वाटंलसं वाटलं, पन ह्यो म्हनजी लागनीचा रोग झाल्यागत डायरीची धा पानं भरली.
बाकी यातल्या सेनसॉर्ड काहन्या भेटल्यानंतर

Comments

Monsieur K said…
general musings.. very well captured... khallas, ekdam!!
Prashant said…
mast.. chan aahe.
सखी said…
Thanks, कोहम, केतन आणि प्रशांत :)
Dk said…
heeee wa! btw tu he HR madhye pg krte aahes ka? kuthuun campus ka kyaa haal? ;)

( I know this is not the right place / fourm to ask this pan kaay karu dusra option kaay aahe? email naahiye!)

Popular posts from this blog

अवघे पंढरपूर

देठाफुलाची गोष्ट