Posts

Showing posts from March, 2009

अवघे पंढरपूर

शुक्रवारी संध्याकाळी कॉलेजच्या दिशेने पदयात्रा चालू होती....चालता चालता कटट्याजवळ आले नि एक संभाषण कानावर पडलं हे असं पुचाट मी काही म्हणणार नाहीये कारण मी भोचकपणे,जाणूनबुजून त्यांच्या नकळत त्या संभाषणात डोकावले होते . ज्युनियर्सची धमाल गँग असावी. "सगळे आले का रे कुंभकर्णा?" इति एक लाल टीशर्ट, tall dark n (handsome च्या थोडं जवळपास जाणारी पर्सनॅलिटी). "कुठे अजून, च्या मारी ह्या पोरींच्या........पूनम आयुष्यात वेळेवर येईल तर च्यायला घडयाळच जसं काही बंद पडणारे" इति ’ विस्कटलेला एक माणूस’. "बट शी इझ स्मार्ट, काहीही म्हण." "स्मार्ट नाही, आगाउ नंबर दोन........काल भेटायला सगळ्यांनी कुठे जमायचंय हे विचारण्यासाठी फोन केला तर ही बया म्हणते, ’संध्याकाळी ये, यमुनाबाई हिर्लेकर चौकात................ दात उचकटू नकोस रे ******, for that moment मला कळलंच नाही कुठल्या चौकात बोलावतेय ती. नंतर म्हणाली अरे आपल्या रुईयाच्या नाक्यावर रे................असं म्हणून ’खि:खी: खि’ करत तुझ्यासारखेच दात उचकटले तिने नंतर. मला सांग, सरळ कॉलेजच्या नाक्यावर ये सांगता येत नाही? खरंच म्हणत

स्वान्त: सुखाय

मने, तुला good morning!! विश करु की आपलं मराठमोळ्या बाण्यात ’शुभसकाळ’ वगैरे म्हणू? खरं तर यापैकी काही एक न म्हणता ’आक्षी झनझनीत श्या हानाव्याश्या वाटत्यात.’ ’पन ह्यो लक्शान बरं न्हाई आक्के’ म्हणून सभ्यतेचा कासोटा तितक्याच सलज्जपणे खोचून ठेवलाय. अश्शी बघू नकोस, ...खरंच! स्वप्नातच कुणीतरी गावरान पंच नाकावर ठेउन दिलाय आणि तेव्हापासून मेंदूला ज्या झिणझिण्या आल्यात...सकाळपासून असंच होतंय. ’पन काय उपेग? बघ ना, टायमाला काय बी सुचंना. परवा मी आणि दिपू बांद्रयाहून घरी येण्यासाठी निघालो. बसनेच जाउया काही रिक्षावर पैसे नकोत घालायला’ असं ठणकावून सांगितलं( अर्थात पलीकडच्या हाटेलात सांबार भुरकल्यानंतरच हा शहाणपणा दाखवला हे तुला म्हणून कंसात सांगतेय)...हं तर बस- स्टॉपवर उभे होतो...सवयीप्रमाणे दहा मिनिटं झाली तरी लाल बावटा दिसंना; पण ’BEST म्हणजे BESHHT’ चं भूत मानगुटीवरुन सुटंना. तेवढयात एक बाई रिक्षावाल्याला घेउनच पुढे आली..... "शेअर करें, स्टेशन जाना है ना? ३ रु. ही होगा।" मुकाटयाने रिक मध्ये बसलो. केसांचा सुटसुटीत बॉयकट, हातात मोठया तीन-चार बॅगा...त्यात मला प्रथम आणि फक्त दिसला तो केक...

अत्तर

(कृष्णा कंप्लेन्ट करतंय की रे, तुला पत्र लिहून सोडलं नाही म्हणून...........तसं भाषेचं फार कष्टं देत नाही मी, मग घाल की काळजी.........चुलीवर म्हणते मी ;P) "बघ बघ, her smile is so cute" आणि पुस्तक खाली ठेउन पाहिलं, तर......काय जीवघेणं हसते रे ती ! ओठांच्या दोन्ही कडांना नाजूकशा खळ्या पडतात, बकुळीची फ़ुलंच दोन टोकांना ठेउन दिल्यागत. तिचं स्माईल 10.2 नी कसं मोठ्ठ होईल ते पहाण्यासाठी दोन दिवस कॅमेरा घेउन तिच्या मागेमागे होते पण ही ढिम्म हसली नाही नि आता.....पण आत्ता कॅमेरा हातात असता तरी क्लिक करावा हेच विसरुन गेले असते. " did you see her cat eyes ?" "मग....?" " I don't like it ." "मग..................काय बार्बीसारखे हवैत?? हं.................................................... तशी ओठ मुडपून हुंकार देण्याची सवय फ़ार त्रासदायक असते नै, तुला नवीन नसेल पण; ’पटलं की नाही पटलं’ हे ठामपणे सांगण्याच्या त्रासातून सुटका :D. अशा नसत्या सवयी आपण लावून घेतो आणि मग त्या ब्रँड होतात. तुला नाहीये एखाद्या वक्तव्यावर ठामपणे बोलण्याआधी डोळे मिटून घेण्याची सवय...