Posts

Showing posts from April, 2009

झहीर

नुकतंच पॉलोचं ’द झहीर’ वाचलं. अल्केमिस्ट सारखाच स्पिरिच्युअल टच झहीर ला ही आहे. हा त्याच्या पुस्तकांचा स्थायी भावच असावा. मुळात लेखनाची आवड असलेला पण अपघाताने एका गायकाशी भेट झाल्यानंतर प्रसिद्ध लिरिसिस्ट म्हणून नावाजलेला ’तो’, फ्री मॅन संकल्पनेला महत्त्व देणारा पण नेमकं फ्री असणं म्हणजे काय या गुंत्यात फसलेलं, त्याच्या पहिल्या दोन-तीन पण जास्त काळ न टिकलेल्या लग्नानंतर ’एश्थर’ बरोबर आठ वर्ष टिकलेलं नातं.............त्याच्या म्हणण्याप्रमाणे नवरा-बायकोतले कॉमन ओकेझनल वाद त्यांच्यात ही होतात पण तरीही एकमेकांचा सहवास त्यांना आवडतो..... आणि ’एश्थर’ म्हणजे एक जिंदादिल उत्साह, पत्रकार या नावापाठोपाठ येणा-या सगळ्या विशेषणांना अनुकूल , त्याच्या बेधुंद वागण्याबद्दल फारसा आक्षेप न घेणारी......... पण एका क्षणी, त्याच्या स्वत:वरच्या प्रेमाच्या कोषातून बाहेर पडण्यासाठी त्याला उद्युक्त करते...... ’सांतियागो’चा स्वत:च्या नाईलाजास्तव, केवळ तिच्या आग्रहापोटी सुरु झालेला त्याचा प्रवास त्याच्या नकळत एक वेगळाच ’तो’ त्याच्या समोर घेउन येतो............... आधी फक्त संगीत, शब्द आणि त्यातून आलेली प्रसिद्धी य

:)

कालपर्यंत जोशात असलेल्या क्रिएटिविटिने आज विश्रांती घेतली ;) काल दुपारी टकवलेलं टेमप्लेटही रात्री एडिट करुन नवीन लावलं. पण हे फायनल....यातली ’अ गर्ल इन विंड’ खूप आवडली. मागचं झाड जरा सायली किंवा प्राजक्ताचं असतं तो और क्या चाहिये था पण तरीही ते पसंतीस उतरलंय. नावही बदललं....’पत्र लिहिण्यास...’ लाडकंच आहे नो डाउट पण ते लेबल म्हणून मागच्या पोस्टस ना दिलं आणि ’मुक्तांगण’ वरती......... हिरवा, पोपटी रंग असतोच लई भारी बरं............ शिवाय मध्ये ’शुभ्ल पांधला’ (;) जम्माडी गम्मत :)
आज काहीतरी नवीन करण्याचा झटका आला होता. सकाळी उठून घरात बसल्या बसल्या वेडगळ, सुखावह वाटणारे प्रकार करावेसं वाटणं.......त्यात कागद, पेन्सिल, पेन, जुने कलर्स, जुन्या पिशवीतलं क्राफ्टचं सामान....त्यातल्या चमचमत्या चांदण्या, पतंगाच्या आकाराचे लुकलुक आरसे, वेलवेट पेपर, बटर पेपर,हॅन्डमेड पेपर, काहीशा चुण्या पडलेला तरीही घडीत दुमडून ठेवलेला, ठिकठिकाणी सेलोटेप लागलेला डिझाईन पेपर, टिश्यू पेपर असा बराच मोठा खजिना हाताला लागला....पण ते करुनही स्टॅमिना न संपल्याकारणाने पीसीला हाताशी घेउन आता उद्योग करुयात असा विचार येताचक्षणी......पेंट, फोटोशॉप मध्ये जाउन लूडबूड केली. सरतेशेवटी ब्लॉगकडे आले. टेम्प्लेट चेंज करण्याचा विचार डोकावण्याचा अवकाश फाईनल्सेन्स वर जाउन दोन तीन टेम्प्लेट टकवली. पहिलं लावलं......ते फार साधं वाटलं...दुसरं एडिट केलं त्याचा कलर डार्क वाटला अशी बर्‍याचदा नाकं मुरडून कॉफीचं हे एक आवडलं. कोणत्या क्षणी मला काय आवडेल याचा भरवसा मला स्वत:ला देता येत नाही, दुस‍र्यांनी देण्याचा प्रयत्न तापदायक ठरतो. माझे मूड स्विंग्झ टिल डेट फक्त मलाच सांभाळता आलेत. त्यामुळे मला आपला ब्लॉगोबा आवडतो. त

एक मुक्तछंद

खूप दिवसांनी लिहायला बसलं की छानपैकी पूर्वीसारखी पेन्सिलीला टोक काढून, शार्पनरमधून बाहेर पडणा-या झिरमिळ्या( दुसरा कोणता शब्द त्याला आत्ता सुचत नाहीये) कंपास बॉक्स मध्ये जपून ठेवत, मग त्याचे शुभ्र कागदावर फुलांसारखे आकार चिकटवून...त्यांच्याकडे समाधान होईस्तोवर पाहून झालं की परत डायरीकडे मोर्चा. मान वाकवून नि मन लावून आउपेक्षा वळणदार अक्षर काढण्याचा एक अविरत प्रयत्न! पण हल्ली लिहायचं म्हटलं की मला धास्ती वाटते ती समोरच्या कागदावर कुठल्या मुक्तछंदात अक्षरं उमटतील याची. मराठीत लिहिण्याची सवय सुटल्यानंतर जे काही पिळ सुटलेल्या रबरासारखं लेचंपेचं अक्षर दिसतं ते पाहून परत हातात पाटी घेउन आपल्याला गिरवण्याची नितांत गरज आहे हे जाणवत रहातं. मग ती घनघोर निराशा पदरी पाडून घेण्यापेक्षा ब्लॉगवर लिहिणं किती सुखावह...एकाच टाकाची अक्षरं, मात्रा, काने. कुणी जाणूनबुजून खोट दाखवण्याचं कारणच नाही. दोन आठवडयांपूर्वी पुण्याला गेले होते दोन ईंटर्व्यूंसाठी. एरवी पुण्यात पाउल टाकलं म्हणजे सगळी अंगावर साचलेली धुळीची पुटं झटकून मन ताजतवानं होतं. इथल्या वेगवेगळ्या संस्कृतींचं लेणं मिरवून मिरवून कुठल्याही एका धड संस