झहीर

नुकतंच पॉलोचं ’द झहीर’ वाचलं. अल्केमिस्ट सारखाच स्पिरिच्युअल टच झहीर ला ही आहे. हा त्याच्या पुस्तकांचा स्थायी भावच असावा.

मुळात लेखनाची आवड असलेला पण अपघाताने एका गायकाशी भेट झाल्यानंतर प्रसिद्ध लिरिसिस्ट म्हणून नावाजलेला ’तो’, फ्री मॅन संकल्पनेला महत्त्व देणारा पण नेमकं फ्री असणं म्हणजे काय या गुंत्यात फसलेलं, त्याच्या पहिल्या दोन-तीन पण जास्त काळ न टिकलेल्या लग्नानंतर ’एश्थर’ बरोबर आठ वर्ष टिकलेलं नातं.............त्याच्या म्हणण्याप्रमाणे नवरा-बायकोतले कॉमन ओकेझनल वाद त्यांच्यात ही होतात पण तरीही एकमेकांचा सहवास त्यांना आवडतो.....

आणि ’एश्थर’ म्हणजे एक जिंदादिल उत्साह, पत्रकार या नावापाठोपाठ येणा-या सगळ्या विशेषणांना अनुकूल , त्याच्या बेधुंद वागण्याबद्दल फारसा आक्षेप न घेणारी.........

पण एका क्षणी, त्याच्या स्वत:वरच्या प्रेमाच्या कोषातून बाहेर पडण्यासाठी त्याला उद्युक्त करते......

’सांतियागो’चा स्वत:च्या नाईलाजास्तव, केवळ तिच्या आग्रहापोटी सुरु झालेला त्याचा प्रवास त्याच्या नकळत एक वेगळाच ’तो’ त्याच्या समोर घेउन येतो...............


आधी फक्त संगीत, शब्द आणि त्यातून आलेली प्रसिद्धी यात रमलेला ’तो’ स्वत:तल्या लेखकाला मनापासून जागं करण्याचा प्रयत्न करतो आणि एका क्षणी त्याला ते गवसतं ही.....एश्थरचं प्रेम त्याला त्याच्यातला ’स्व’ शोधण्यासाठी मदत करतं.............पण ते तेवढ्यापुरतंच.


त्याच्यावर मनापासून प्रेम करणा-या एश्थरला कुठली तरी एक पोकळी कायम जाणवत रहाते.....तिला युद्ध चालू असताना वॉर करस्पॉंडट म्हणून काम करण्याची संधी येते.....आणि तिच्यातली ही अस्वस्थता उफाळून वर येते. स्वत:च्याच जगण्यातला फोलपणा तिला नव्याने जाणवायला लागतो.............


आनंदी होण्याची नेमकी प्रत्येकाची व्याख्या काय, आपण स्वत:ही सगळं असून समाधानी आहोत का??? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी कोणत्याही एका निश्चित मार्गाकडे बोट न दाखवणारा मार्ग तिला खुणावतो.....


" Haven't you got everything you need?'
"I have everything a woman could want.'
'What's wrong with your life then?'
'Precisele that, I have everything, but I'm not happy. And I"m not the only one either.

आणि अचानक एक दिवस तिचं काहीही न सांगता निघून जाणं त्याला अस्वस्थ करतं.......परत एकदा त्याचं लेखन बंद होतं. त्याचं कारण तिच्या नसण्याशी जोडून त्याचा पुढचा प्रवास सुरु होतो.

त्यात त्याच्या आयुष्यात ब‍र्याच घटना घडून जातात. ’मेरी’ सारखी वलयांकित अभिनेत्री त्याला मैत्रिण म्हणून मिळते, परत लेखन करण्याचा त्याचा प्रयत्न यशस्वी ठरतो......पण त्या सगळ्यात एश्थरचं अस्तित्त्व त्याला ठळकपणे जाणवत रहातं.

त्याच्यातला ’झहीर’, ती अनाम अस्वस्थता वाढत जाते ’एश्थर’ च्या नसण्याशी एकरुप होत जाते.......आणि तिला शोधण्याचा त्याचा प्रवास सुरु होतो. कोणत्या वळणावर आपण उभे आहोत याचा शोध घेताना, त्याच्यातला पुरुष एक सत्य मान्य करतो.....

’I was always looking for myself in the women I loved.
I looked at their lovely clean faces and saw myself reflected in them. They on other hand, looked at me and saw the dirt on my face and, however intelligent and self-confident they were, they ended up seeing themselves reflected in me and thinking that they were worse than they were. Please don't let that happen to you Marie."

त्यापुढच्या त्याच्या प्रवासात एक अजून छोटी कथा समांतर जोडून येते, जी बरीच स्पिरिच्युअलिअटी, मेसेज ऑफ लव अशा गोष्टींविषयी बोलत जाते तेव्हा तिथे कुठेतरी कथेपासून डिटॅच झाल्यासारखं वाटतं; पण एश्थरच्या मध्यवर्ती संकल्पनेशी बांधलं गेलेलं नातं कायम रहातं.............कारण माझ्या मनातले असे बेबंद झहीर एखाद्या क्षणी सरसावून उभे रहातात पण ते आपली स्पेस एन्काउन्टर होतेय एवढं म्हणून त्रागा करण्यापर्यंतच मर्यादित रहातात. एश्थरच्या थिंकींग प्रोसेसशी आपण एकरुप होतो पण तिचं धाडस उसनं घेता येत नाही.

कथानकाच्या शेवटी ही ’तो’ तोच रहातो पण त्याच्यातला झहीर त्याला स्वत:च्याच स्वत:शी झालेल्या नव्या ओळखीचं प्रतिबिंब दाखवून देतो.

Comments

indradhanu said…
सखी,
खुप छान लिहिलस.

Popular posts from this blog

अवघे पंढरपूर

देठाफुलाची गोष्ट