Posts

Showing posts from June, 2009

धाडस

लिहवत नाही कारण पेटलोच कुठे? पेटण्यासाठी ’जगलोच’ कुठे? असं जगण्यासाठी धाडस असावं लागतं, ते तरी रुजलंय कुठे? मग असल्या वांझोटया समाजाला शिलगावीत का नाहीस? तसं शिलगावण्यासाठीही धाडस लागतं गडया......

ही वाट दूर जाते

पाठोपाठ दोन सलग आठवडयांनी कंटाळ्याला ऊत आणला की मी समोरच्या रस्त्याचं टोक पकडून सुसाट चालत सुटते. घराच्या खिडकीतून डोकावून पाहिल्यावर रेंगाळलेला रस्ता दिसतो.....रस्त्यावर उभं राहिलं की डाव्या हाताला लागूनच एक मोठ्ठंच्या मोठ्ठं खाजण पसरलंय....वेडया -वाकडया, खुरटया कशाही वाढलेल्या खारफुटी आणि पलीकडे उंच बिल्डिंग्झची एक आडवी रांग.... मागे मान वळवून पहावी तर कंपाउंड वॉलच्या आत गच्च गर्दीत, सुपारीच्या झावळ्यांची मिट्ट दाटीवाटी आणि त्यात हरवून गेलेली खिडकी...... त्यातल्या त्यात लक्षात राहतात त्या पोफळीच्या झाडांवरच्या पांढुरक्या रेषा, मध्यावर ठळक आणि पायथ्याशी पुसट होत गेलेल्या....वरच्या अंगाला त्यातूनच फुलून आलाय की काय असं वाटायला लावणारा हिरवाकंच पोफळीचा गाभा.....त्यातून बारीकसे तुरे आणि छोटी फळं दिसायला लागलीयेत...... पुढे पुढे जाताना मिचकुडया निऑन लाईट्सचा प्रकाश आळशासारखा वरच्या वरच झाडांवर पसरुन तेवढाच भाग सोनेरी होउन लखलखतो.....उतरतीला वाकून रस्त्याकडे झेपावणा-य़ा त्यांच्या फांद्या....आता पाउस सरसरेल तशा तरारुन वर येतील.... याच रस्त्याचं बोट धरुन पुढे चालावं तर तोंडापाशी येताच