अवघे पंढरपूर

शुक्रवारी संध्याकाळी कॉलेजच्या दिशेने पदयात्रा चालू होती....चालता चालता कटट्याजवळ आले नि एक संभाषण कानावर पडलं हे असं पुचाट मी काही म्हणणार नाहीये कारण मी भोचकपणे,जाणूनबुजून त्यांच्या नकळत त्या संभाषणात डोकावले होते. ज्युनियर्सची धमाल गँग असावी.

"सगळे आले का रे कुंभकर्णा?" इति एक लाल टीशर्ट, tall dark n (handsome च्या थोडं जवळपास जाणारी पर्सनॅलिटी).
"कुठे अजून, च्या मारी ह्या पोरींच्या........पूनम आयुष्यात वेळेवर येईल तर च्यायला घडयाळच जसं काही बंद पडणारे" इति ’ विस्कटलेला एक माणूस’.
"बट शी इझ स्मार्ट, काहीही म्हण."
"स्मार्ट नाही, आगाउ नंबर दोन........काल भेटायला सगळ्यांनी कुठे जमायचंय हे विचारण्यासाठी फोन केला तर ही बया म्हणते, ’संध्याकाळी ये, यमुनाबाई हिर्लेकर चौकात................
दात उचकटू नकोस रे ******, for that moment मला कळलंच नाही कुठल्या चौकात बोलावतेय ती. नंतर म्हणाली अरे आपल्या रुईयाच्या नाक्यावर रे................असं म्हणून ’खि:खी:खि’ करत तुझ्यासारखेच दात उचकटले तिने नंतर. मला सांग, सरळ कॉलेजच्या नाक्यावर ये सांगता येत नाही? खरंच म्हणतेय की पकवत्ये म्हणून आधी इथे येउन बोर्ड बघितला...तर हे कट्ट्याचं नाव आहे ते पहिल्यांदाच बघतोय मी."

"म्हणूनच सांगतोय यमूबाई स्मार्ट आहेत आपल्या."

त्यांचे उर्वरित सभ्यतेच्या आसपास म्हणूनही न फिरकणारे संवाद मी ऐकत बसले नाही पण क्षणभर हास्याची एक फुसकुली अंगावर फिरली, मग मीही जाताना मुद्दाम त्या बोर्डकडे निरखून पाहिलं........खरंच इतके दिवस माझंही तिथे लक्ष गेलं नव्हतं.............एक कट्टा कॉलेजचा म्हणून जेवढा फेमस होउ शकतो तेवढे खचितच इतर कट्टे लोकप्रिय होत असतील रे.

’ही कॉलेज आमची काशी, हा नाका पंढरी................’ आठवलं?
आज खचकन जाणवून गेलं...आपल्यासाठी कॉलेजच ’अवघे पंढरपूर’ का असतं?

बास्स आता वाटतंय तडक उठून कँटीनमध्ये जावं........ ट्रेमधून हिंदकळणारं सांबार,ईडली, थंडगार झालेला वडा-पाव पोटात ढकलावा...आणि एक मस्त वाफाळलेली नेसकॉफी मारावी.
कित्तेकदा कँम्पसमध्येच बसून कँटीनच्या, अख्ख्या कॉलेजच्या, प्रोफेसर्सच्या नावाने हमखास बोटं मोडलीयेत. पण कसाही असला तरी तो आपला हक्काचा कॅम्पस होता यार....शी!! कसंसंच झालं एकदम.

ओळीने लागलेली अशोकाची झाडं, दुस-या मजल्यावरच्या खिडकीतून एकटा-दुकटा दिसणारा गुलमोहर, कँटीनमागचं आळशी बदामाचं झाड....आणि वर त्याच्या गर्ल्स कॉमन रुम मध्ये डोकावणा-या फांद्या...आज वाटतंय त्या झाडावर चढून कॉमन रुममध्ये डोकावण्याची हिंमत कोणत्याही मुलाने केली नसेल??? I doubt!! :P ( तसं एखाद्याने खरंच केलं असतं, तर तर तो मला नक्की आवडला असता.:D). झकासरावांच्या सखीची आठवण आली एकदम ;)
कायम कँटीनमधून येणारा फोडणीचा characteristic स्टिंक, लॅबमधून भन्नाटपणे नाकात जाणारा एच टू एस......पण ट्रेनमधून जाताना बायकांच्या डोक्याला थापलेल्या तेलाचा वास घेण्यापेक्षा अमोनियाच्या बाटलीला जाउन नाक लावणं परवडलं एकवेळ. अमोनियाच्या वासाबद्दल काही वेगळं सांगायला हवं का? :P
कॉलेजच्या मागच्या बाजूला असणा-या छोट्या डबक्यात कमळं कधी येतील याचीही बरीच वाट बघून झाली..पण ती काही उमललीच नाहीत. त्यातही कॉलेजचं अविरत सुरु असलेलं कन्स्ट्रक्शन.........’अरे कधी संपणार ते? की आपलं बिरबलच्या खिचडीसारखं चालूच?’(तेव्हा ’कशाकरता.......... तर कॉलेजच्या कंन्स्ट्रक्शनकरता मी आर्किटेक्ट व्हायचं ठरवलं होतं बरं का..)
कॉलेजच्या पिलर्सच्या अगदी जवळ जवळ वाढलेली अशोकाची झाडं तोडली होती तेव्हा कोण राग आलेला...सगळ्यांची अक्कल काढून झालेली.

भटची चहाची टपरी, वडेवाल्या आजी, कॉर्नरचा सँडविचवाला, दाबेलीवाला, झेरॉक्सवाला( त्याच्या दुकानाचं नाव ’पार्श्व झेरॉक्स सेंटर’ का होतं ह्याचं कोडं मला अजून उकलेलं नाही :D ते काहीही असो; मात्र परीक्षा जवळ आल्या की त्याच्या इतकी मोस्ट वॉन्टेड व्यक्ती कुणीही नसेल) .......दिक्षित रोडच्या शाळेतून वरच्या खिडक्यांमधून खाली बाटल्या फेकणारी, चिंचा-कैरीवाल्या भय्याच्या मागे भुणभुण करणारी आणि खाली उभे राहिलो की वेडावून दाखवणारी ती चिमणबाग......

एक प्रश्न मात्र अजूनही कॉमन आहे, "यु हॅव बॉयफ़्रेंड?" :D
"nope !"
"डोन्ट टेल मी, यू डोन्ट हॅव बॉयफ़्रेंड!! ( अशावेळी समोरच्या माणसाच्या चेह-यावरचे भाव काय मजेदार असतात. थोडक्यात......... "क्काय सांगतेस?, तुला किडनीच नाही.......................? असं म्हणताना येतील तसे)
मलाही मग कसंनुसे भाव चेह-यावर आणून त्यांच्या समाधानापुरतं म्हणावंसं वाटतं,
"देख ना यार शीट!!! मेरे पास तो बॉयफ़्रेंड ही नहीं।" ;)

(यावरुन शाळेतली पोरं आठवतात....मध्यंतरी ती शाकालाका बूम्म्बूम अशी एक कुठलीतरी सिरियल होती. त्यातल्या मॅजिक पेन्सिलची...(पेन्सिलच्या टोकावर एक चेहरा आणि लांबलचक पेन्सिल) फॅशन आली होती. ज्यांनी ती अगदी बाजारात आल्या बरोब्बर दुस-या दिवशी आणली त्यांना ती वर्गात मिरवण्याचा कोण आनंद ;) मुद्दाम खोड्या काढून साळसूदपणे फूस लावत विचारायचं,

’ए, तेरे पास ’वो’ वाली पेन्सिल नहीं???
"नहीं....मम्मीने लेकर कहाँ दी है अब तक?”
"okk....मम्मी को बोलना मेरे मम्मीने है ना वोह सामनेवाले दुकाम में से ली सिर्फ़ ट्वेंन्टी रुपीझ ओन्ली ;P."
मग ज्याच्याकडे नाहीये त्याचा चेहरा इवलासा झाला की बाजूचाही फ़्रेंडशिप वगैरे आठवून म्हणणार,
"अच्छा ठीके तब तक हम ये शेअर करेंगे ओक्के?" स्वारी खुश...
लहान मुलांचं काय बरं असतं नै? सगळं शेअर करतात. :D )

अपवादात्मक सुखद दृष्य वगळता बॉयफ्रेंड कॅलेंडरच्या पानांसारखे बदलत असतात ही गोष्ट तिसरी. पण खरंच त्यांच्या छॊट्या छोट्या गोष्टी फक्त कॅम्पसलाच ठाउक असतील.
’गच्चीमधून खिडकी किती छान दिसते, आज मला तुला पहावेसे वाटते.....इथपासून ते
खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली.....असल्या रावस गाण्यांपर्यंत त्यात भलतीसलती मॉडिफिकेशन्स करुन ती बडवणं....वाईट्टातले वाईट्ट पी.जे, फेस्टच्या नादात तनमन(धन नाही) सगळं विसरुन बूस्टर दिल्यासारखं काम, रात्रीची जागरणं, सरप्राईझ बर्थ डे पार्टी, डेज.......अशात फसफसणारा कॅम्पस, थंडीत धुक्याला मिठी मारुन बसलेला कॅम्पस, मात्र परीक्षा येउ घातल्या की तोंडावर बोट, हाताची घडी घालून बसल्यासारखा.................. सगळ सगळं लख्ख डोळ्यासमोर टवटवीत होउन पुढे आलं बघ. कॉलेजमधून बाहेर पडलो आणि सगळंच हरवलं.

अजूनही लॅब-कोटवर सिल्व्हर मिरर टेस्टचे डाग आहेत, एक कॅडबरीच्या आतलं चांदीचं रॅपर आहे, J बिरुद मिरवणारी की-चेन आहे.........कुठे साठवून ठेउ? कोणत्या कोप-यात?

"आँखों में सपने लिये घर से हम चल तो दिये,
जाने ये राहें अब ले जायेगी कहाँ....
मिट्टी की खुशबू आये,
पलकों में आँसूं लाये
पलकों पें रह जायेगा यादों का जहाँ
मंझिल नयी है अंजाना है कारवाँ, चलना अकेले है यहाँ

तनहा दिल तनहा सफर ढूँढे तुझे फिर क्यूँ नजर.........


एवढयात पुरे , नाहीतर तुला वाचता येणार नाही खारट झालेलं अक्षर, भर उन्हाळ्यात कसा पाउस पडला असं म्हणशील.
_______________________


बाय द वे, नुकतीच पंढरीची वारी झाली तेव्हा पाहिलं, आपल्या नव्याने बांधलेल्या पिलर्सवर नाजूक वेली कमानी वाकवून उभ्या झाल्या आहेत आणि गुलमोहराचा सडा अजूनही एन्ट्रन्सवरच :) मस्त नं !!!!!


( कुणालातरी खो द्यावासा वाटतोय, सवडीने घ्या आणि लिहा रे नक्की.)

Comments

Rashmi Jain said…
kbhi kbhi sab kuch badal kar bhi kuch nhi badalta..
Sweet post, flied me back to those memorable days......
Deepak said…

"डोन्ट टेल मी, यू डोन्ट हॅव अ बॉयफ़्रेंड!!
अशावेळी समोरच्या माणसाच्या चेह-यावरचे भाव काय मजेदार असतात. थोडक्यात......... "क्काय सांगतेस?, तुला किडनीच नाही.......................? असं म्हणताना येतील तसे.!


काय मस्त कंपॅरिजन आहे.... छान लिहिलंय...! बाकी, कौलेजचे दिवस हे आयुष्यातील काही चांगल्या क्षणांची एक खास नोंद असते, नाही का?

- भुंगा
Yawning Dog said…
saheech post ahe, collegechya athavnee alya.

पार्श्व झेरॉक्स सेंटर, ashakyaaaaa...kuthe ahe he, mala bhetayche ahe ya xeroxvalyala.
Kasale naav thevle aahe, mala tar farch philosophical vagere vatale buva :)
सखी said…
This comment has been removed by the author.
सखी said…
Shona,
Kya bataye, kaise kahe...dil ka hal lafjo mein keh na sake :)

भुंगा,
आयुष्यातले नुसते खास नाही,खासम-खास क्षण रे...कॅसेट रिवाईंड करता आली तर.....:)

Yawning,
अरे, त्या झेरॉक्सवाल्याच्या नावावरुन आम्ही त्याच्याच दुकानात उभे राहून चर्चा ;) करायचो. पण आता ते झेरॉक्स सेंटर बंद झालंय :( तिथे केक शॉप उभं राहिलंय.
Dk said…
ए सखे/सख्ये, व्वा छानच लिहिलयस तू! :D

"डोन्ट टेल मी, यू डोन्ट हॅव अ बॉयफ़्रेंड!! क्काय सांगतेस?, तुला किडनीच नाही हेहेहे.. तुला इथे हृदय (हा शब्द मी कधीही नीट लिहू शकलो नाहीये! पण मला हृदय आहे!!) ही टाकता आल असत गं! किडनी म्हणजे काहीतरीच :)

हम्म्म पार्श्व झेरॉक्स म्हणजे पाठपोठ फोटोकॉपी काढून मिळतील अस सुचवायच असेल नावातूनते झेरॉक्स सेंटर बंद झालंय हाहा पाठपोठ फोटोकॉपी काढून असच होणार :)

...कॅसेट रिवाईंड करता आली तर प्रचंड उलथा पालथ होईल! त्यापेक्षा नवी कॅसेट लाव नं ;)

तर एक प्रश्न:डोन्ट टेल मी, यू डोन्ट हॅव अ बॉयफ़्रेंड अजूनही ??? अगं केलस काय कॉलेजात? ओ हो म्हणून डिप्लोमा करत्येस? हाहाहाहा
Dk said…
"देख ना यार शीट!!! मेरे पास तो बॉयफ़्रेंड ही नहीं।"
अपवादात्मक बदल वगळता बॉयफ्रेंड कॅलेंडरच्या पानांसारखे बदलत असतात

बॉयफ़्रेंड काय बॉलपेन आहे का?? कॅलेंडरच्या पानांसारखे बदलायला?

अजूनही लॅब-कोटवर सिल्व्हर मिरर टेस्टचे डाग आहेत अरे मग तू मनुष्यबळ संसाधनाचे कार्य काय हाती घेतलस?

Mail id is: kuldeep1312@gmail.com
सखी said…
बॉयफ़्रेंड काय बॉलपेन आहे का?? कॅलेंडरच्या पानांसारखे बदलायला?

हो मग कुठे आहेस तू काळाच्या मागे? ;)आणि मी म्हटलंय नं अपवादात्मक चांगली रिलेशन्सही असतात, नो डाउट :)
आणि माझा labcoat मी जपून ठेवलाय. वा रे वा असा कसा टाकेन तो... :D
उपहासात्मक म्हणून किडनीच पर्फ़ेक्ट वाटतो...हृदय नाही. म्हणजे ’तुला जन्मजात एकच किडनी आहे??’ असं विचारताना चेह-यावरचे हावभाव कमालीचे असतात.
Dk said…
हम्म्म

तर एक प्रश्न:डोन्ट टेल मी, यू डोन्ट हॅव अ बॉयफ़्रेंड अजूनही??? ह्या प्र. च उत्तर अवघड आहे वाटत? ;) अहो बाईसाहेब ई पत्ता दिलाय बर का :)
me said…
boyfriend nahi war kidney nahi ashi reaction! baaaaap comparison :)zakas ;)
me said…
tuzya nakalat tu mazya nakya chya aathwani chalawalyas! i miss my naka i miss my collage days.........
Shashank Kanade said…
जमलंय!

1. "बुम्बूम": इंग्रजी शब्द असे मराठीत लिहिले की कसे झकास वाटतात नाही? उदा: टॅनेक्स(tan(x)), एफॉफेक्स (f(x))

2. "लहान मुलांचं काय बरं असतं नै?"
ह्या "नै" वरून तोत्तोचान ची आठवण झाली एकदम.
Jaswandi said…
kasala bhannat lihilay! sahich!!
Sneha said…
mastach ga... sahi vatal... majhya collegat jaun aalyasarakh... amhi masti vegelich keliye... pan still
:)
chabuk bar ka ga... :P
सखी said…
दीप,
ते सांगणं अवघड नाही..पण काही फुलं गुलदस्त्यात ठेवण्याची एक खोड आहे...काय करणार ’जित्याची खोड......’ :P

शशांक,शाल्मली,स्नेहा,जास्वंदी खूप खूप धन्यवाद :)
Too good!
ही कमेण्ट मलाच पुचाट वाटली, म्हणून मग मुकाट देवनागरी टंकायला घेतलं. कसलं फ्रेश आहे लिहिणं... पण इथून पुढे काही लिहायला सुचेचना. तर जाऊ दे. ब्लॉग रीडरमधे ऍड केला, हे महत्त्वाचे सांगून थांबते!
Anonymous said…
INSERT
Anonymous said…
One heyday, a construction masses turned up to start edifice a billet on the unessential lot.

The 6jw3v8vl [url=http://kamachu.000space.com/ned.html]310833[/url] 1sc4v1xs [url=http://limaimenapolnostu.edublogs.org/2012/11/28/shy-japanese-come-to-the-interview-wearing-masks/]1zt4n3ge[/url] [url=http://poa7.000space.com/usd.html]504729[/url] inheritor lone's nearest's 5-year-old daughter as a consequence took an investment in all the

hobby in the chips on next door and dog-tired much of each lifetime observing the workers.
Anonymous said…
[b][url=http://www.louisvuittonsalebest.com/]louis vuitton handbags[/url][/b] Like, the leaders of health and fitness are health professionals. Therefore, the businesses need to retain their eyes open on producing overall health shoes. Not a word, is just taking motion. Research suggest which the really presence of crops reduce emotional stress. If someway we've been overpowered by fret and stress, just have a very glance of the lovable flower for a trice and lo we have been fear absolutely free and strain significantly less. In high-quality it can be stated that plant not only mesmerize but additionally pull all toward them and by their strength of attraction they evaporate dullness and tediousness.

[b][url=http://www.uggsbootsoutletnow.com/]uggs boots[/url][/b] Hydroponic units do not have these negatives in order to just let individuals green thumbs do their job and garden away. An additional major furthermore facet is the fact that the rising will be performed within so this suggests year spherical plants. And let us be sincere, that may be what we might all want is this not real? Viewing that this new strategy for interior gardening is now such a terrific results, there is a great deal of info about the net concerning this new way of increasing..

[b][url=http://www.shippingonlineplaza.com/]louis vuitton purses[/url][/b] Superior color might be striking the senses as well as a pose on the Mongolian lamb jackets and vests of Versace. Meanwhile, Philosophy's homage towards the swinging sixties arrives in candy coloured coats with Kalgan lamb in bubble gum pink or Jeremy Scott go brilliant orange in a very cropped shearling jacket and Louis Vuitton crank up the tone of their colored shearling hats. Moreover, bold black and white styles originate from Matthew Williamson's autumn/winter selection with vivacious zigzag and checkerboard lamb layouts or Gareth Pugh offers all black but dramatic striped coats and capes in both males and women's fur vogue..
I like me some fried okra with tobasco so I set to operate heating up the oil, getting ready for your fry fest which was going to materialize. All of it turned out seriously properly, however my initial endeavor to pour the nevertheless sizzling oil right into a container resulted in me spilling the oil all over myself. When you have the opportunity to acquire sizzling oil spilled on you, I advise you politely drop.

[b][url=http://www.discountlouisvuittonoutlet.co.uk/]louis vuitton outlet[/url][/b] Females are generally anxious to accumulate one or more handbags. Although the price levels of Designer bags are incredibly superior when compared to the opposite everyday purses. Besides the expensive concerns of designer purses, there are many phony designer purses which are bought these days while in the market.
And of course, don't forget the open air purchasing. There are plenty of areas in Barcelona where by open air buying is available. Some locations consist of the Sagrada Familia, the Outdated Port and Portal Angel. Invest in from Reputable On the web Perfumes Outlets - Dependability arrives initially if you end up earning the selection of shopping for branded perfumes like Armani perfume, or Puma fragrance, or Escada perfume. Branded perfumes are thoroughly clean and higher excellent perfumes and when you are obtaining them from on the internet merchants ensure that which you check the trustworthiness of save. A reliable on-line store don't just lists clean perfume brands, but additionally you will have plenty of selections to build according for your style and charm..
Anonymous said…
top [url=http://www.001casino.com/]casino online[/url] brake the latest [url=http://www.realcazinoz.com/]online casinos[/url] autonomous no deposit bonus at the best [url=http://www.baywatchcasino.com/]bay attend casino
[/url].
Anonymous said…
First of all I would like to say fantastic blog!
I had a quick question in which I'd like to ask if you do not mind. I was curious to know how you center yourself and clear your thoughts prior to writing. I have had trouble clearing my mind in getting my ideas out. I do enjoy writing but it just seems like the first 10 to 15 minutes tend to be wasted simply just trying to figure out how to begin. Any suggestions or tips? Kudos!

Also visit my page ... Zahngold

Popular posts from this blog

देठाफुलाची गोष्ट