अत्तर

(कृष्णा कंप्लेन्ट करतंय की रे, तुला पत्र लिहून सोडलं नाही म्हणून...........तसं भाषेचं फार कष्टं देत नाही मी, मग घाल की काळजी.........चुलीवर म्हणते मी ;P)

"बघ बघ, her smile is so cute"

आणि पुस्तक खाली ठेउन पाहिलं, तर......काय जीवघेणं हसते रे ती !

ओठांच्या दोन्ही कडांना नाजूकशा खळ्या पडतात, बकुळीची फ़ुलंच दोन टोकांना ठेउन दिल्यागत. तिचं स्माईल 10.2 नी कसं मोठ्ठ होईल ते पहाण्यासाठी दोन दिवस कॅमेरा घेउन तिच्या मागेमागे होते पण ही ढिम्म हसली नाही नि आता.....पण आत्ता कॅमेरा हातात असता तरी क्लिक करावा हेच विसरुन गेले असते.

"did you see her cat eyes?"

"मग....?"

"I don't like it."

"मग..................काय बार्बीसारखे हवैत??

हं....................................................

तशी ओठ मुडपून हुंकार देण्याची सवय फ़ार त्रासदायक असते नै, तुला नवीन नसेल पण; ’पटलं की नाही पटलं’ हे ठामपणे सांगण्याच्या त्रासातून सुटका :D. अशा नसत्या सवयी आपण लावून घेतो आणि मग त्या ब्रँड होतात. तुला नाहीये एखाद्या वक्तव्यावर ठामपणे बोलण्याआधी डोळे मिटून घेण्याची सवय.....काय पहात असशील, की नुसतीच आपली पापण्यांची उघडझाप......

हनुवटीवर हात ठेउन तिला न्याहाळत असताना एकदम डोक्यात मिणमिण झाली. तिच्या हसण्यातही तसाच जीवघेणा वेध आहे........परस्पर भिन्न गोष्टींचं एकमेकांशी नातं जोडून देण्याचा कोण छंद आहे हा कळत नाही. हो पण जीवघेणा भावही ’ हर एककी अपनी स्टाईल असतो’, हे ठाउकच नव्हतं. मानूच्या हसण्य़ात देवघरातली शांतता कुठून येते हे तिलाच ठाउक पण तुझ्या हसण्यातला जीवघेणा मोकळेपणा तिच्यात नाही हे नक्की. जीवघेणा तो फक्त माझ्यासाठीच कारण त्यावर कुणाचीही जान फिदा होते म्हणून. तसं insecure वगैरे वाटत नाही....पण उगीच आपलं.


माझं हल्ली प्रीतमच्या ’इन दिनों दिल मेरा........"सारखं काहीसं झालंय....हे गाणं बघताना नेहमी शिल्पाच्या जागी तब्बू हवी होती असं वाटतं...तिचा संयत अभिनय कसोटीला उतरतो.

’जब मिलें थोडी फुरसत, खुदसे कर ले मुहोब्बत’...........खुदसे मुहब्बत आहे तशी पुरेपूर ;) पण त्या मुहब्बतीतले माझे अंदाज वेगळेच असतात. आता खुदसे मोहोब्बत म्हणजे मी गझला, ग्रेसची वैष्णवी, ढीगभर लेटर्स.....असे काही उद्योग चाळवणार...हो आणि त्यात तू आणलेलं शाही अत्तरही उघडून पहावंसं वाटतं...हे म्हणजे पन्ह्यातल्या वेलचीसारखं...........काय!!!( खादाड उपमा द्याव्यात नेहमी.....कारण पोटाशी डायरेक्ट कनेक्शन असतं नं....मग मनावर त्याचा स्वाद दीर्घकाळ रेंगाळतो.)

"कोणत्या वासाचं आणू?"

"मला असे वास सांगता येत नाहीत पण."

"अगं कोणता, कसला वास आवडतो निदान हे तरी ठाउक असेल ना, म्हणजे आवडतो ना कुठलातरी.....की..?"

"तो अण्णांच्या बागेत सक्काळी देवचाफ्याचा,प्राजक्ताचा धुक्यात मुरलेला,असा मस्त वास येतो नं त्याची सर कशालाच नाही."

"काहीतरी भलतंच आवडायला हवं का?" :)

तसं हे अत्तरही वाईट नाहीये पण तो वास काही वेगळाच असतो....मला आतआत उमलून आल्यासारखं होतं.

तसंच मानू हसली की त्याला एक गंध येतो....तो वेगळा......त्यात हवीहवीशी शांतताही झिरपत जाते.

हल्ली एक नवा दरवळ जाणवतो स्वत:च्याच अवतीभवती....दरवळ कसला कुपीच आहे ती अत्तराची, त्यातलं अत्तर म्हणे कधीही संपत नाही.....

तुझीच,

........*********........

ता.क. हे शेवटल्या ओळीतलं अत्तर कोणतं? विचारु नकोस असा कृष्णेचा निरोप आहे. का?.........तुला कस्तुरी मृगाची गोष्ट ठाउक नाहीये म्हणून.

Comments

me said…
i can call it a hugely romantic love later! :)
नमस्कार.
मराठी ब्लॉगकारांशी गप्पागोष्टी करायला आवडेल ना? मग
http://marathi-e-sabha.blogspot.com/ या ब्लॉगवर "शब्दबंध २००९ - उद्घोषणा" हे पोस्ट अवश्य वाचा.
धन्यवाद.
Gayatri said…
:) सखी, तुझा email address देशील? --gayatrinatu[at]gmail[dot]com
Dk said…
hehe waw! bloggerchya duniyetlya great loknaapaiki asceh thode hee jar mi lihu shklo na tar majaa yeil! bole to ekdam zkkkaas! :)

Popular posts from this blog

अवघे पंढरपूर

देठाफुलाची गोष्ट