रोज काही नवीननवीन(त्याही चांगल्या) पोस्टस सुचत नाहीत...पण तरीही काहीतरी लिहावंसं वाटतं, रोज घडेल ते सगळंच इंटरेस्टींग नसलं तरीही.....म्हणून एक नवीन ब्लॉग सुरु केला. अर्थात त्यामागची आयडिया/ कल्पना ही इतर ब्लॉग्स पाहूनच सुचली..अमलात आणावीशी वाटली. तेव्हा सर्किट, कोहम, जास्वंदी यांना थॅक्स :)
अवघे पंढरपूर
शुक्रवारी संध्याकाळी कॉलेजच्या दिशेने पदयात्रा चालू होती....चालता चालता कटट्याजवळ आले नि एक संभाषण कानावर पडलं हे असं पुचाट मी काही म्हणणार नाहीये कारण मी भोचकपणे,जाणूनबुजून त्यांच्या नकळत त्या संभाषणात डोकावले होते . ज्युनियर्सची धमाल गँग असावी. "सगळे आले का रे कुंभकर्णा?" इति एक लाल टीशर्ट, tall dark n (handsome च्या थोडं जवळपास जाणारी पर्सनॅलिटी). "कुठे अजून, च्या मारी ह्या पोरींच्या........पूनम आयुष्यात वेळेवर येईल तर च्यायला घडयाळच जसं काही बंद पडणारे" इति ’ विस्कटलेला एक माणूस’. "बट शी इझ स्मार्ट, काहीही म्हण." "स्मार्ट नाही, आगाउ नंबर दोन........काल भेटायला सगळ्यांनी कुठे जमायचंय हे विचारण्यासाठी फोन केला तर ही बया म्हणते, ’संध्याकाळी ये, यमुनाबाई हिर्लेकर चौकात................ दात उचकटू नकोस रे ******, for that moment मला कळलंच नाही कुठल्या चौकात बोलावतेय ती. नंतर म्हणाली अरे आपल्या रुईयाच्या नाक्यावर रे................असं म्हणून ’खि:खी: खि’ करत तुझ्यासारखेच दात उचकटले तिने नंतर. मला सांग, सरळ कॉलेजच्या नाक्यावर ये सांगता येत नाही? खरंच म्हणत...
Comments
pan mala tithe comment nahi lihita ali. comment cha text box ch disat nahi. 'll try later.
tumacha likhaan mazya peksha kiti tari paTine chaangala ahe, tevha mi tumhala inspire kela mhaNaNa agadi kahitari ch.
tumachi lekhanachi style pahun tumhi ajun kahi lihilele blogs vachalet asa vaTat rahata. paN te jau det, chhan lihitaye, lihit raha.
shubhechchha!
त्या टेम्प्लेटमुळे पेजेस ओपन होताना थोडा प्रॉब्लेम येत होता बहुतेक,चेंज केलं मी ते...हुश्श! आणि ब्लॉग वाचताना (कोणाचाही) त्या माणसाच्या शब्दातून ते वाचण्यातच मजा असते, तेव्हा लेखनाचा प्रश्न अशावेळी गौण होतो, इतरांशी शेअर करावंसं वाटून एखाद्याने ते मांडलंय.....स्वत:च्या शब्दात हेच महत्त्वाचं.मलाही स्वत:पेक्षा इतरांचं लेखन अधिक प्रभावी वाटतं नेहमी :)
@कोहम,
अरे, तुम्हाला सगळ्यांनाच सुचलेल्या कल्पनेचं कौतुक एकत्रच केलं...सुचणं आणि यशस्वीपणे अमलात आवडणं ही केवढी अचीव्हमेंट आहे माझ्यासाठी तरी :)
हो आणि त्या वाहवत जाण्याच्या सूचनेसाठी धन्यवाद!! माझ्याही लक्षात आलंय ते,आता आपणहून फॉर्ममध्ये येईल :D