उनाडी गंमत

बरं कधीकधी सकाळी उठून मला walk ला जावसं वाटतं....रोज काय तेचतेच बघायचं?.....तोच सूर्य, तीच झाडं,तोच रस्ता मग मला बोअर होतं. सकाळ कशी......कधीतरी उठून तिचं वेगळेपण अनुभवावं,मस्त romantic वगैरे व्हावं, धुंदफ़ुंद कविता कराव्यात आणि दाट धुक्याचा झाडात साचून राहिलेला हिरवा सुवास घ्यावा,प्राजक्ताला आंजारुन-गोंजारुन घ्यावं, झुबकेदार होउन पायावर लोळणा-या उन्हाशी कुजबुजत रहावं, टवटवीत सकाळ अलगद उतरवून घ्यावी....हे सगळं करण्यात कधीतरीच मज्जा असते गं’ हे असं आउला सांगितलं तर म्हणाली, ’तुला रोज उठायचा कंटाळा येत नाही, त्याच घरी यायचा कंटाळा येत नाही हे नशीब माझं :D

’न चुकता सकाळी पाकात पिळून काढलेल्या रस्गुल्ल्यासारखं ’love you" आणि संध्याकाळी तोच रस्गुल्ला बासुंदीत बुडवून काढल्यासारखं ’miss u a lotttt' असं लाडे लाडे श्रीजा कसं बोलू शकते??? कंटाळा नाही येत रोज लाडिक बोलण्याचा तिला?’
"तुला काय problem आहे त्या बिचारीचा, बोलेनात का.....त्या बंबूलाही आवडतं नं ते मग सोड ना" ......इति कविता.
हे प्रकरण नवंनवं असणार म्हणून हे असं....अशी माझी आपली आधी समजूत होती पण कविने सांगितलं हे अगं दोन वर्ष झाली....तेव्हा मात्र थोडं आतल्या आत कौतुकही वाटलं...दोन वर्षानंतरही ह्यांना काहीतरी म्हणावंसं वाटतंय हे काही कमी नाही....फ़क्त आपलं ते रोज गोडावलेले शब्द मला पचेनात..मुंग्या येतात बघून डोळ्यांनाही....
"गोड आवडत नाही तुला?????"
"म्हणजे?.....रोख काय आहे नेमका प्रश्नाचा?"
"अगं.....कोके ’तुला’ गोड आवडत नाही?"
"ohhh! मला वाटलं नेहमीसारखं काहीतरी चावट पिल्लू सोडलंयस :P. माझा कोकणस्थी पणा फ़क्त कुणाला शालजोडीतले मारताना किड्यासारखा वळवळतो इतकंच....गोडात आकंठ बुडण्याइतपत अजून नाहीये."
":D"
"कठीण आहे भविष्यात गो......तुझे."
"का का???? " आता हे फ़ार साळसूदपणे विचारलं होतं मी.
तर काही न बोलता गालातल्या गालात खुदखुदून गेली......
ती रोज अशी एकसर न हसता काहीतरी वेगळीच हसते असं मला रोज वाटतं ;)

Comments

me said…
nice.......... cute indeed :)
Tulip said…
खूप आवडलं सखी. एकदम क्यूट लिहिलं आहेस.
Dk said…
’तुला रोज उठायचा कंटाळा येत नाही, त्याच घरी यायचा कंटाळा येत नाही हे नशीब माझं :D खीखीखीखीखीखी

अस म्हणते तुझी आई?? लक्की आहेस मला ती प्रेमाने म्हणते अरे घोड्या आज रात्री किती वाजता उगवणार?
Dk said…
गोड आवडत नाही तुला?????"
umm ye baat kuch hazam nahi hui :(

Popular posts from this blog

अवघे पंढरपूर

देठाफुलाची गोष्ट