Posts

Showing posts from September, 2009

तात्या

आज्यो...बाssss', आज्योssबा’ कितीतरी वेळ आज्यो मधल्या ’ज्यो’ वर एक इनोसन्ट गिरकी घेत माझ्या अगदी समोर उभ्या असलेल्या माणसाच्या खांद्यावर त्याचं आजोबा पुराण चाललेलं. ठेक्यात चार पाच वेळा त्याच्याकडून आबोजा-बिबोजा असं कौतुक करुन घेतल्यावर आजोबानेही कपाळावरचा घाम पुसला. बराच वेळ त्याच्याकडे बघत बसल्यावर नंतर मलाही गरम व्हायला लागलं. ’काय पण जागा मिळालीये गुंफा बांधायला...’टेकडीवर चढून बांधायची ना..’ असा माझा मूक वैताग चाललेला. गुंफा बांधायच्या, म्हणजे फक्त बांधून ठेवायच्या...डागडुजी करण्याच्या नावाने बोंब..पलीकडे ताटाएवढ्या भोकातून गळती सुरु, वावर नाही तिथे शेवाळं हौसेने वाढलेलं...नवरात्र, महाशिवरात्रीला हीssssss गर्दी. ’पुष्कळ जुन्या म्हणजे २००-३०० वर्ष जुन्या असतील नाही का’...कुणी म्हणायचा अवकाश लोकांचं पुढचं वाक्य असतं’ पांडवकालीन’ आहेत’.. ????????? २००-३०० वर्ष जुन्या पांडवकालीन कशा असतील.... बरं असल्याच तर पांडव इथे राहून गेले म्हणून प्लीज सांगू नका...जिथे जावं तिथे हेच ऐकावं पांडव अज्ञातवासात असताना इथे होते......अर्रे....याला काहीतरी प्रमाण? असं विचारायला जावं तर पुढचं उत्त

बाल्कनी : २

गजा काकू म्हणजे ठेवल्या नावाला वजनानिशी जागणारी बाई! काकूंची दृष्टी अलौकिक, गजाआडच्या सृष्टीचा अंदाज घेणारी. "बाल्कन्यांवर भारी नजर या बाईची, नवीन साडी आणून वाळत घालायची खोटी..यांना कळलंच!" इति नवरत्ने. "इतनीभी बुरी नहीं है गजाजी।" इति सोनी. (सोनींना सोसायटी आणि सोसायटीला सोनी नवख्या होत्या त्या काळापासूनची त्यांची गजाकाकू ही मैत्रिण. त्यामुळे तसा त्यांचा काकूंबाबतीत सॉफ्ट कॉर्नर होता.) "मामींचं नाक काय तीक्ष्ण आहे हो..परवा मी हे टूरवर जाणार म्हणून कडबोळ्या करायला घेतल्या, आपसूक बातमी लागल्यासारख्या ह्या आल्या..म्हणे शिल्पे खमंग वास येतोय बाल्कनीतून. आज काय निलेशराव स्पेशल वाटतं..., मग रेसिपी लिहून घेउन, चार टेस्ट करण्यासाठी म्हणून घेउन गेल्या. खूप छान झाल्यायत म्हणाल्या." शिल्पा-निलेश सोसा.तलं नवदाम्पत्य..शिल्पा त्यांना आवर्जून मामी म्हणते.(अजूनही). "सुनंदे, मेले डोळे आहेत की फुंकणी? जाळ काढशील बघता बघता..." इति बेळगावची म्हातारी. तिला एकटीलाच फक्त काकूंना अशा प्रकारे बोलण्याची सवलत होती. त्यामागचं गुपित-गोटाकडून कळलेलं कारण म्हणजे..बेळगावच्या उ