रात्रमयुरा..

दिवसातले गोंधळ, त्यांना दारापर्यंत निरोप देउन मी रात्रीच्या हक्काच्या जगात प्रवेश करताना कसं मोकळं मोकळं वाटतं......कित्ती दिवसांनी आउचा मोबाईल गवसला.....तिच्या नकळत उचलून आणलेला नाहीतर तिने बघितलं की हे रात्री कानात घालून मी गाण्यांच्या वरातीत होते तर तिच्या रागाचा पारा थेट वर जातो. आणि....’काढ ती कानातली टोपली(ear phone's ना याहून चांगला शब्द मी अजून शोधतेय म्हणजे तिला सांगता येईल)..दोन-दोन तास कानात अडकवून कानांच्या जवळ ठेउ नको कितीदा सांगितलंय खाजणं होतील कानाची" :O (कानाची खाजणं???)
आउचा रागाचा पारा चढला की ती मराठीत गावरान सुटते....कुठल्याही अक्षरामागे कुठलंही अक्षर स्टॅंप लावून पाठवून देते...शब्द भिरभिरल्यासारखे इकडून-तिकडे पळत सुटतात. शाळेचे सुंदर, एकवळणी हस्ताक्षरातले,कौतुकं मिरवणारे अहवाल लिहीणारी ही तीच आउ का? असा मला प्रश्न पडतो.
मग तिच्यासमोर मी नि विभू दाताच्या फ़टीत कोंबता येईल तितकं हसू कोंबतो आणि तिची पाठ वळायचा अवकाश खि:खी:खि:खी:....
तिच्या शब्दांची वेगळी डिक्शनरी तयार होईल’आउझ डिक्शनरी’ ( जसं चाउस तसं आउझ) :D

पण आउला कुठाय ठाउक गाण्यांबरोबर माझे विचारही माझ्याबरोबर फ़िरायला बाहेर निघतात...कधी रमतगमत तर कधी डायरेक्ट स्केटिंग शूज घालून.....मनसोक्त फ़िरुन येउन मग बर्फ़ात उतरतात.....मग तिथेच अडकून बसायचं. हे असं तिला मी सांगितलं तर तिला भिती वाटेल पोरगी ऑटिस्टिक होणारे...मग उगीच तिच्या डोळ्यांत काळजीतले ससुले मी बघत राहाणार......

हे आठवूनच हसू येतं...कानात टोपली घालून एफ़.एम सुरु होतं आणि मलिष्का ओरडते...सॉरी दुसराच आर.जे किंचाळतो...’मलिष्का का सबसे बडा फ़ॅन कॉन्टेस्ट’.......काय बावळट हसला तो.....चॅनेल चेंज....तो दुसरं कार्टून ओरडतं.......SMS( superhit music show)....कंटाळवाणी वाटतात तीही कधीतरी. मग वैताग येतो............
जराशी खिडकी उघडून बाहेर बघताना वर आकाशात दोन-तीन लुकलुक चांदण्याही पेंगुळलेल्या दिसतात वाटतं मस्तं गवतावर जाउन उनाड गप्पा कराव्यात त्यांच्याशी पण त्या जास्तच आळसावलेल्या.....

मग परत येउन एफ़.एम चा आवाज मोठा करुन बसते.......दीपूने पाहिलं तर कुचक्यासारखा म्हणेल.."तुम्ही केव्हापासून?.....एफ़.एम बिफ़ेम ह्म्म्म, तेही एवढया कर्कश्श्श?"
मी नि माउ तो असं कानात घालून २४ तास ऐकताना दिसला की त्याच्या बहिरेपणावर त्याचे कान विटेस्तोवर यथेच्छ बोलतो....आणि संपूर्ण संभाषणात तो फ़क्त..’अगं पण.........आत्ताच तर.....चांगलं गाणं होतं म्हणून..........अरे.....तुझ्या तर............." एवढंच बोलू शकतो.

एवढयात गोल्डवर बरं काहीतरी कानावर पडतं......जुन्या गाण्यांचा छंद हा हल्ली लागलेला.....
"ये तो बस्स आशियाना है....यादों का, बहारोंका और...’ हा अनुरागसारखं बोलायचा प्रय्त्न करतो पण जमत नाही. तो गाणं लावतो..........
"थोडी सी जमीं,थोडा आसमां......
तिनकों का बस एक आशियां" ......
शब्द मनावर रुंजी घालण्याचा अवकाश सकाळची ट्रेन आठवते....गडबडीत लक्षात राहिलेली ’ती’ समोर येते.

ती आत्ता का आठवावी??? एखाद्या राजकन्येसारखी तिची केतकीवर्णाची आकृती नजरेसमोर तरळून जाते....छोटीशीच पण काचेतून बाहेर आलेल्या बाहुलीसारखी, त्यातही तिच्या गळ्यातला काळा ताईत माझ्या लक्षात राहतो.....तिच्या बरोबर असणा-या बाईच्या दुपट्ट्याशी तिचा सारखा चाळा, ती बाई तिची आई होती की अजून कोणी कळेना पण तिच्या चेह-याकडे मात्र बघवेना., आणि त्यात त्या मुलीवरुन नजर बाजूला करुन त्या बाईकडे फ़ार वेळ मी पाहिलंच नाही. कोण असेल ती??????
ट्रेनमध्येही माझ्या समोरच्याच सीटवर बसलेली. तिचं येणा-या जाणा-या प्रत्येक विक्रेत्या पोरांकडे, त्यांच्या खेळण्यांकडे लक्ष.....त्याच्या हातातलं पेंटिग बुक बघून तिने उत्सुकतेने त्या बाईकडे पाहिलं पण तिचं लक्ष दुसरीकडेच........म्हणून ती गप्प! कित्ती कुतूहल त्या एवढ्याशा डोळ्यात..........
अशी येता-जाता किती माणसं दिसतात..... सगळे चेहरे कुठे लक्षात राहातात पण काही असे तुकडे माझ्या डोक्यात पक्के कोरले गेलेले.......
स्टेशनवर धावपळत जाताना त्याच्या बासरीतून निघणारे करुण सूर मला क्षणभर थांबवतात, त्याला दृष्टी नाही????????? माझ्या उघड्या डोळ्यांनी मी पाहू शकणार नाही असं काहीतरी तो त्याच्या बासरीतून सांगतो.......सुंदर तरी करुण.
भरभर दो-यावर मोग-याच्या कळ्या ठेउन.....उलटीसुलटी फ़ुलं अगदी न पहाता अचूक गुंफत आणि एकीकडे पुस्तक वाचत ती मोग-याच्या कळ्यांसारखीच शुभ्र हसत मला गजरा देते....गुंफ़लेल्या फ़ुलांमधून तिच्या चमकीतून उजळलेलं हसू मी घरी घेउन येते.....

अलिबागच्या समुद्रात मनसोक्त हुंदडताना मला तो दिसतो....त्याच्या पोरसवदा हातांनी मांडीवर नारळ ठेउन, हातातला त्याचा मख्खन धारवाला(हे त्याचंच विशेषण) चाकू पटापट चालतो....आणि मलई काढून पुढ्यात धरतो....छोट्याशा खोपट्यात त्याची आईसुद्धा माझ्यासारखंच पण आईवेडया कौतुकाने त्याच्याकडे पाहात राहते. त्याचे उत्साहाने शिकण्याचे छंद ती कौतुकभरल्या डोळ्यातून सांगते........

वेडया आशेतले, निरागस डोळ्यातून वाहाणारे हे कवडसे मला वेडावून सोडतात.........
हर दिल में अरमां होते तो है,
बस कोई समझे जरा.............

गाणं संपतं......रात्रीचे मोर निळ्या-जांभळ्या रंगातून गर्द होत झाडाखाली विसावतात......

Comments

Monsieur K said…
u cant really stop the mind from wandering while listening to the songs at night, right?
excellent choice of songs! :)
especially like "tinka, tinka, zaraa, zaraa" sung by alisha!

simply blog hopped here - its my 1st visit and i liked reading your stuff!

all the best!
keep writing :)
सखी said…
"u cant really stop the mind from wandering while listening to the songs at night"
very true!!!

thanks a lottt :)
saurabh V said…
"गाणं संपतं......रात्रीचे मोर निळ्या-जांभळ्या रंगातून गर्द होत झाडाखाली विसावतात...... "





Claaaaaaaaaassssssssss!

avaDala shevaT! [:)]

Popular posts from this blog

अवघे पंढरपूर

देठाफुलाची गोष्ट