Posts

Showing posts from February, 2009

प्रिय आउस,

प्रिय आउस, "काल महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुझ्या हातची खमंग थालीपीठं खायला मिळतील.....अशाच खुशीत आणि किचनमधून येणा-या वासासरशी मांजरीचं नाक लावून आत गेले आणि पाहिलं.....बाबा थालीपीठं करतायत आणि तू बाहेर.....फ़ायलिंग करत बसली होतीस तुझ्या जगावेगळ्या आवडत्या कामांपैकी हे एक. खरं सांगू का गं, काल तुझ्यापेक्षा बाबांच्याच हातून छान झाली होती थालीपीठं. भाजाणी केप्रचीच, पण थालीपीठं मात्र मला हवी तशी मस्त कुरकुरीत....ती मउ मउ खाणं म्हणजे बोळक्या तोंडाने उगीच उम्म्म्म केल्यासारखं वाटतं, त्याऐवजी ऐटीत आगाउपणा करत,दातांचं ऐक्य मिरवत दह्यात बुडवून खाण्यात कोण आनंद असतो ठाउक आहे? आणि बाबा म्हणजे अगदी, काठालाही हलक्या दाबाने बोटं फ़िरवून, मध्येच छोटी भोकं पाडून काळजीपूर्वक पॅनवर घालत होते...कारण तुझ्या सराईतपणे फ़िरणा-या हातांची थालीपीठांना सवय त्यामुळे आज अलगद तव्यावर पडून तेलात चुरचुरणा-या त्यांच्याकडे बघून गंमत वाटली. त्यातून ती बाबा करत असताना अजूनच. नुसती थालीपीठंच नाही तर गरम गरम मुगाची खिचडी, टोमॅटो राईस, फ़ुलके ही बाबांकडे आम्ही हट्टाने केलेली मागणी.....अगदी क्वचितच करतील पण ते अगदी मन ला

उनाडी गंमत

बरं कधीकधी सकाळी उठून मला walk ला जावसं वाटतं....रोज काय तेचतेच बघायचं?.....तोच सूर्य, तीच झाडं,तोच रस्ता मग मला बोअर होतं. सकाळ कशी......कधीतरी उठून तिचं वेगळेपण अनुभवावं,मस्त romantic वगैरे व्हावं, धुंदफ़ुंद कविता कराव्यात आणि दाट धुक्याचा झाडात साचून राहिलेला हिरवा सुवास घ्यावा,प्राजक्ताला आंजारुन-गोंजारुन घ्यावं, झुबकेदार होउन पायावर लोळणा-या उन्हाशी कुजबुजत रहावं, टवटवीत सकाळ अलगद उतरवून घ्यावी....हे सगळं करण्यात कधीतरीच मज्जा असते गं’ हे असं आउला सांगितलं तर म्हणाली, ’तुला रोज उठायचा कंटाळा येत नाही, त्याच घरी यायचा कंटाळा येत नाही हे नशीब माझं :D ’न चुकता सकाळी पाकात पिळून काढलेल्या रस्गुल्ल्यासारखं ’love you" आणि संध्याकाळी तोच रस्गुल्ला बासुंदीत बुडवून काढल्यासारखं ’miss u a lotttt' असं लाडे लाडे श्रीजा कसं बोलू शकते??? कंटाळा नाही येत रोज लाडिक बोलण्याचा तिला?’ "तुला काय problem आहे त्या बिचारीचा, बोलेनात का.....त्या बंबूलाही आवडतं नं ते मग सोड ना" ......इति कविता. हे प्रकरण नवंनवं असणार म्हणून हे असं....अशी माझी आपली आधी समजूत होती पण कविने सांगितलं हे अगं

रात्रमयुरा..

दिवसातले गोंधळ, त्यांना दारापर्यंत निरोप देउन मी रात्रीच्या हक्काच्या जगात प्रवेश करताना कसं मोकळं मोकळं वाटतं......कित्ती दिवसांनी आउचा मोबाईल गवसला.....तिच्या नकळत उचलून आणलेला नाहीतर तिने बघितलं की हे रात्री कानात घालून मी गाण्यांच्या वरातीत होते तर तिच्या रागाचा पारा थेट वर जातो. आणि....’काढ ती कानातली टोपली(ear phone's ना याहून चांगला शब्द मी अजून शोधतेय म्हणजे तिला सांगता येईल)..दोन-दोन तास कानात अडकवून कानांच्या जवळ ठेउ नको कितीदा सांगितलंय खाजणं होतील कानाची" :O (कानाची खाजणं???) आउचा रागाचा पारा चढला की ती मराठीत गावरान सुटते....कुठल्याही अक्षरामागे कुठलंही अक्षर स्टॅंप लावून पाठवून देते...शब्द भिरभिरल्यासारखे इकडून-तिकडे पळत सुटतात. शाळेचे सुंदर, एकवळणी हस्ताक्षरातले,कौतुकं मिरवणारे अहवाल लिहीणारी ही तीच आउ का? असा मला प्रश्न पडतो. मग तिच्यासमोर मी नि विभू दाताच्या फ़टीत कोंबता येईल तितकं हसू कोंबतो आणि तिची पाठ वळायचा अवकाश खि:खी:खि:खी:.... तिच्या शब्दांची वेगळी डिक्शनरी तयार होईल’आउझ डिक्शनरी’ ( जसं चाउस तसं आउझ) :D पण आउला कुठाय ठाउक गाण्यांबरोबर माझे विचारही माझ्य

चिरागदानं

ब्लॉग सुरु केल्यापासून, हावरट मुलासारखं मिळतील तेवढे सगळे ब्लॉग्स पाहून टाकले...वाचून झाले. एकदम आईस्क्रीम, टॉफ़ीझ,चिंचा,खेळणी एकत्र मिळाल्यावर छोटया पिल्लूचा चेहरा कसा हरखून जाईल नं तस्संच झालं. नुसते ब्लॉग्स नाहीयेत हे........ही चिरागदानं आहेत!!! चिरागदानं हा शब्द पेशवाईतला.....झुंबरांसाठी किंवा पूर्वीच्या काळी जी महाल प्रकाशित करण्यासाठी छताला लागून दिव्यांची काचेतली आरास असे त्यांना चिरागदानं म्हणतात. ही सुद्धा मनातली चिरागदानंच नाही का? मनातल्या खोल,गूढ दालनात अधांतरी पाय ठेवावा आणि नंतर ही सुबक लेणी नजरेस पडून हरखून जावं असं काहीसं झालं माझं.....मनातली सरसहून सरस शिल्पं...काही सुबक, कोरीव शब्दनशब्द टिपून घ्यावा, तर काही अगदी आकार नसलेली पण वेडुकली तरी त्यांच्याशिवाय काहीतरी रितं राहिल्यासारखं वाटावं अशी.... गायत्रीचं लेखन....श्रीमंत करुन जाणारी भाषा, शब्दांचे चकवे, अनपेक्षित हळवेपण आणि नेमक्या क्षणी उंची गाठण्याची कला...सुंदर!! टयुलिपची वर्णनात्मक ओघवती स्टाईल...तिच्या दैनंदिनीत कुठेतरी स्वत:लाच पाहिल्याचे आभास करुन देते. संवादिनी सुमेधा, मंजिरी,....असे कित्येक आणि तरी अजून मुलांच
उगीच अस्फ़ुटपणे माझी फ़ुटणारी मी तुला ठाउक आहेच...पण माउ गं, डोशावरल्या वरवर पडणा-या कधी खरपूस वास सुटलेल्या जाळीसारखं होतं बघ माझं कधीकधी..निसतं उन उन पसरावं तसं कढलोण्यासारखं मी पसरत जावं आणि मग विरघळल्यागत एकजीव होउन जावं स्वगताशी. खिडकीवर हलत राहतं उन, त्यातली उबदार झुळूक कुठं आतआत जाउन भिडते...शब्दांच्या वेणांसारखी आतवरच खोल पडून राहाते. धूळ साचलेल्या पानावर बरोब्बर मध्येच तुकतुकीत छोटी पालवी धुमारते....मग जुनी पालवी गळून का पडत नाही....की आपलं गर्द हिरव्या पानातून पोपटी कोवळेपण उठून दिसतंय म्हणून झाड काही निरोपाचे दिवे घेत नाही. केशराच्या काडयांनी सजवलेल्या घट्ट खरवसाच्या वडीची आठव येते गं..आजी आत्ता येउन हातावर ठेवेल अन भरभरुन आशिर्वाद देईलसं वाटतंय....माघीच्या दिवशी भजनं ऐकली आणि लख्खं चकाकणा-या गणपतीच्या सोंडेवरलं फ़ूलंच होउन जावंसं वाटलं. मी वेळ नाही म्हणता म्हणता गार फ़रशीवर पाय टाकला आणि मग कळलं त्यादिवशी माघी चतुर्थी होती....कसं योगायोगाने पोहोचले नि तिथलीच झाले. जिंकल्या शुभंकर शक्ती....पण मी भांडलेच नव्हते कधी माझा विश्वास नाही म्हणत.....आस्तिक आणि नास्तिकाच्या खोल मृग