Posts

Showing posts from August, 2009

बाल्कनी : १

’बाल्कनी’ म्हणजे बाल्कनी ! बैठ्या सोसायटयांमधल्या घरकर्‍यांचा जीव की प्राण, म्हणजे जीव गेला तरी प्राण बाल्कनीत शिल्लक असं काहीसं बाल्कनी उर्फ गॅलरीचं पूर्वीचं ग्लॅमर. त्यातली मानाच्या गणपतीसारखी ’मानाची गॅलरी’ म्हणजे ’डी’च्या रुमची गॅलरी. ऐसपैस, मोकळीढाकळी सेम सोसायटीतल्या बायकांसारखी. तशी सोसायटीतल्या प्रत्येक घराला बाल्कनी, पण ती पुढे-मागे असण्यातली गोम फक्त सोसायटीकरांनाच ठाउक. हाउसफुल्ल शो चं तिकीट काढताना नाटक आणि सिनेमा यातली गल्लत बराच काळ चुटपुट लावू शकते तशीच जागा घेताना बाल्कनी पुढे-मागे असण्याचं महत्त्व लक्षात घेतलं नाही तर आयुष्यभराची खंत गॅलरीत पुरून जगावं लागतं. बाल्कनीच्या घराचं प्रेस्टीज फार...म्हणजे ’विवाह नोंदणी कार्यालयाने ’मुलगा स्वतंत्र नाही पण राहत्या घराच्या बेडरुम सेपरेट’ अशी’ आकर्षक’ ऍड द्यावी तसं सोसायटीकरांनी उपवर मुलीच्या पित्याला ’आमची ’डी’ची रुम, विथ अटॅच्ड बाल्कनी/बाल्कनी अटॅच्ड’ असं सांगून उपकृत करावं. गॅलरीवर लोकांचं असं प्रेम!! एवढं की शेलाटेंसारख्या अभिमानी मध्यमवर्गीय माणसाने संपूर्ण आयुष्यच गॅलरीत ’संगणकी शिकवण्या’ घेत वेचलं. तर सांगायची गोष्ट ही की

देठाफुलाची गोष्ट

आमचा विभू म्हणजे अगदी छोटं छोटं गोरंपान बाळ होतं तेव्हा... त्याला मांडीवर घेउन गप्पा चालल्या होत्या आमच्या, म्हणजे त्याला फक्त ही ही हु हु, आणि फारतर फार जोरात रडता येत होतं, आणि मला एखाददुसरी अंगाई म्हणता(ऐकवेल इतपत गोड आणि गायला सुरु करायचा अवकाश फार काळ अंत न बघता त्याला पटकन गुडुप्प झोप येईल अशी) येत होती. त्याचा बोलण्यासाठी प्रयत्न मात्र सुरु झाला होता. काहीतरी बघून खुद्कन हसण्याचेही खेळ चालले होते. अचानक त्याच्या तोंडून बोबडी हाक ऐकली....आणि दोन सेकंद कानांवर विश्वासच बसेना. तश्शीच टुण्णकन उडी मारुन धावत आईला सांगायला गेले. "आई, विभूने हाक मारली ती ही माझं नाव घेउन, hehhe ’आई’ म्हटलंच नाही आधी त्याने..टुकटुक..मज्जा." आईलाही ऐकून गंमत वाटली होती. आम्ही म्हणजे काय आसमंतातच....कुणी अभ्यास बिभ्यास न करता डॉक्टरेट दिल्यासारखा आनंद झाला होता. आपण काय म्हटलं हे त्याला कळण्याची सोयच नव्हती. तो आपला मस्त सतरंजीचं एक टोक तोंडात पकडून माझ्याकडे पाहून हसत होता. यानंतर एक आठ नउ वर्षांनी..... . . . . आमची नेहमीसारखीच उतास जाईल इतकी वादावादी ऐकून आई वैतागली होती. "काय चाललंय तु