Posts

Showing posts from May, 2009

पत्र लिहिण्यास कारण की......

"तुझ्या कानात कूsssss कलू?????" एक वेलचीचा टाका वर घेउन मी वर बघण्याच्या आत, कानाजवळ एक गुदगुली झाली....पण त्या सरप्राईजच्या खटाटोपात बोटातून ती हिरवी गुंडाळी खाली पडली...क्षणार्धात ती उचलून परत फुलपाखरासारखी बोटं गुंफून कानाजवळ........यावेळी मात्र जोरात शीळ या टोकातून त्या टोकाकडे गेली. चिमुकल्या आनंदात गालावर एक लब्बाड हसू उमटलं होतं. "कान दुखला ना माझा...बघू काय आहे ते?" काय असेल?? यू वोन्ट बिलिव्ह अर्चन,.........’पिंपळाचं पान’,...त्याचं बारीक वेटोळं करुन फुंकर घालून शीळ घालण्याचे उद्योग चालले होते. "कुणी शिकवलं हे?? काय काय करत असतेस ठमे तू...." त्यावर ओठांचा नाजूक चंबू झाला... "वासूसू..sssss ने." माझ्या भुवया नकळत वर गेल्या. "आजोबा.....आजोबा म्हणायचं त्यांना, वासू नाही...काय?" बाजूच्याच खांबावर गिरक्या घेण्याचा कार्यक्रम सुरु झाला...लक्ष नाहीये आपलं असं सुचवत. मग मीही माझा हेका सुरु ठेवला. गिरकीसरशी तिचा एक हात बाहेर झेपावला तोच पकडून तिला पुढे आणलं...आणि दोन्ही हात एकात बांधून विचारलं... "काय म्हणायचं मनू....?" बारीकशा प

विसावा

"आई, आपल्याला गाव का नाहीये?" "अगं गाव नाहीये असं नाही, पण आता तिथे कुणी रहात नाही." "पण का राहात नाहीत, सगळे सुट्टीत गावाला जातात , माझ्या सगळ्या मैत्रिणी जातात....आपणच जात नाही." "तुझं घर आपण कोकणातच घेउ, मग तर झालं?" "पण आत्ताची मजा तेव्हा येईल का?" "बरं एक काम करु...आपण या सुट्टीत खानवलीला जाउन येउ...मामाला सांगूयात तसं." "तुला गाव आहे?" "हो......आम्ही भरपूर धमाल केलीय अगं लहानपणी. मी आणि दादा मामा.....काय काय नाही केलंय ते विचार. तुला आणि विभूला नेउन आणू." "पण मग तू एवढे वर्ष का गेली नाहीस परत?" "अगं लग्नानंतर जाणं झालंच नाही, पण आता जाउ...." "हं...." "बघ हो, पण गावाला पाणी नसतं हल्ली....लाईट्स जातात ब‍र्याचदा." "बघू ते आपण नंतर......आधी मला जायचंय तिथे." पाच वर्षांपूर्वी आयुष्यात पहिल्यांदा गावाला जाउन आले...ती गावाची पहिली आणि आतापर्यंत शेवटची ओळख. आठवणी मात्र अजूनही ताज्या....... ’कारने जाताना दुरून दिसणारी रोपं, मधूनच दिसणारा पिवळ्या फुलांचा गच