झहीर
नुकतंच पॉलोचं ’द झहीर’ वाचलं. अल्केमिस्ट सारखाच स्पिरिच्युअल टच झहीर ला ही आहे. हा त्याच्या पुस्तकांचा स्थायी भावच असावा. मुळात लेखनाची आवड असलेला पण अपघाताने एका गायकाशी भेट झाल्यानंतर प्रसिद्ध लिरिसिस्ट म्हणून नावाजलेला ’तो’, फ्री मॅन संकल्पनेला महत्त्व देणारा पण नेमकं फ्री असणं म्हणजे काय या गुंत्यात फसलेलं, त्याच्या पहिल्या दोन-तीन पण जास्त काळ न टिकलेल्या लग्नानंतर ’एश्थर’ बरोबर आठ वर्ष टिकलेलं नातं.............त्याच्या म्हणण्याप्रमाणे नवरा-बायकोतले कॉमन ओकेझनल वाद त्यांच्यात ही होतात पण तरीही एकमेकांचा सहवास त्यांना आवडतो..... आणि ’एश्थर’ म्हणजे एक जिंदादिल उत्साह, पत्रकार या नावापाठोपाठ येणा-या सगळ्या विशेषणांना अनुकूल , त्याच्या बेधुंद वागण्याबद्दल फारसा आक्षेप न घेणारी......... पण एका क्षणी, त्याच्या स्वत:वरच्या प्रेमाच्या कोषातून बाहेर पडण्यासाठी त्याला उद्युक्त करते...... ’सांतियागो’चा स्वत:च्या नाईलाजास्तव, केवळ तिच्या आग्रहापोटी सुरु झालेला त्याचा प्रवास त्याच्या नकळत एक वेगळाच ’तो’ त्याच्या समोर घेउन येतो............... आधी फक्त संगीत, शब्द आणि त्यातून आलेली प्रसिद्धी य...