Posts

अवघे पंढरपूर

शुक्रवारी संध्याकाळी कॉलेजच्या दिशेने पदयात्रा चालू होती....चालता चालता कटट्याजवळ आले नि एक संभाषण कानावर पडलं हे असं पुचाट मी काही म्हणणार नाहीये कारण मी भोचकपणे,जाणूनबुजून त्यांच्या नकळत त्या संभाषणात डोकावले होते . ज्युनियर्सची धमाल गँग असावी. "सगळे आले का रे कुंभकर्णा?" इति एक लाल टीशर्ट, tall dark n (handsome च्या थोडं जवळपास जाणारी पर्सनॅलिटी). "कुठे अजून, च्या मारी ह्या पोरींच्या........पूनम आयुष्यात वेळेवर येईल तर च्यायला घडयाळच जसं काही बंद पडणारे" इति ’ विस्कटलेला एक माणूस’. "बट शी इझ स्मार्ट, काहीही म्हण." "स्मार्ट नाही, आगाउ नंबर दोन........काल भेटायला सगळ्यांनी कुठे जमायचंय हे विचारण्यासाठी फोन केला तर ही बया म्हणते, ’संध्याकाळी ये, यमुनाबाई हिर्लेकर चौकात................ दात उचकटू नकोस रे ******, for that moment मला कळलंच नाही कुठल्या चौकात बोलावतेय ती. नंतर म्हणाली अरे आपल्या रुईयाच्या नाक्यावर रे................असं म्हणून ’खि:खी: खि’ करत तुझ्यासारखेच दात उचकटले तिने नंतर. मला सांग, सरळ कॉलेजच्या नाक्यावर ये सांगता येत नाही? खरंच म्हणत...

स्वान्त: सुखाय

मने, तुला good morning!! विश करु की आपलं मराठमोळ्या बाण्यात ’शुभसकाळ’ वगैरे म्हणू? खरं तर यापैकी काही एक न म्हणता ’आक्षी झनझनीत श्या हानाव्याश्या वाटत्यात.’ ’पन ह्यो लक्शान बरं न्हाई आक्के’ म्हणून सभ्यतेचा कासोटा तितक्याच सलज्जपणे खोचून ठेवलाय. अश्शी बघू नकोस, ...खरंच! स्वप्नातच कुणीतरी गावरान पंच नाकावर ठेउन दिलाय आणि तेव्हापासून मेंदूला ज्या झिणझिण्या आल्यात...सकाळपासून असंच होतंय. ’पन काय उपेग? बघ ना, टायमाला काय बी सुचंना. परवा मी आणि दिपू बांद्रयाहून घरी येण्यासाठी निघालो. बसनेच जाउया काही रिक्षावर पैसे नकोत घालायला’ असं ठणकावून सांगितलं( अर्थात पलीकडच्या हाटेलात सांबार भुरकल्यानंतरच हा शहाणपणा दाखवला हे तुला म्हणून कंसात सांगतेय)...हं तर बस- स्टॉपवर उभे होतो...सवयीप्रमाणे दहा मिनिटं झाली तरी लाल बावटा दिसंना; पण ’BEST म्हणजे BESHHT’ चं भूत मानगुटीवरुन सुटंना. तेवढयात एक बाई रिक्षावाल्याला घेउनच पुढे आली..... "शेअर करें, स्टेशन जाना है ना? ३ रु. ही होगा।" मुकाटयाने रिक मध्ये बसलो. केसांचा सुटसुटीत बॉयकट, हातात मोठया तीन-चार बॅगा...त्यात मला प्रथम आणि फक्त दिसला तो केक......

अत्तर

(कृष्णा कंप्लेन्ट करतंय की रे, तुला पत्र लिहून सोडलं नाही म्हणून...........तसं भाषेचं फार कष्टं देत नाही मी, मग घाल की काळजी.........चुलीवर म्हणते मी ;P) "बघ बघ, her smile is so cute" आणि पुस्तक खाली ठेउन पाहिलं, तर......काय जीवघेणं हसते रे ती ! ओठांच्या दोन्ही कडांना नाजूकशा खळ्या पडतात, बकुळीची फ़ुलंच दोन टोकांना ठेउन दिल्यागत. तिचं स्माईल 10.2 नी कसं मोठ्ठ होईल ते पहाण्यासाठी दोन दिवस कॅमेरा घेउन तिच्या मागेमागे होते पण ही ढिम्म हसली नाही नि आता.....पण आत्ता कॅमेरा हातात असता तरी क्लिक करावा हेच विसरुन गेले असते. " did you see her cat eyes ?" "मग....?" " I don't like it ." "मग..................काय बार्बीसारखे हवैत?? हं.................................................... तशी ओठ मुडपून हुंकार देण्याची सवय फ़ार त्रासदायक असते नै, तुला नवीन नसेल पण; ’पटलं की नाही पटलं’ हे ठामपणे सांगण्याच्या त्रासातून सुटका :D. अशा नसत्या सवयी आपण लावून घेतो आणि मग त्या ब्रँड होतात. तुला नाहीये एखाद्या वक्तव्यावर ठामपणे बोलण्याआधी डोळे मिटून घेण्याची सवय......

प्रिय आउस,

प्रिय आउस, "काल महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुझ्या हातची खमंग थालीपीठं खायला मिळतील.....अशाच खुशीत आणि किचनमधून येणा-या वासासरशी मांजरीचं नाक लावून आत गेले आणि पाहिलं.....बाबा थालीपीठं करतायत आणि तू बाहेर.....फ़ायलिंग करत बसली होतीस तुझ्या जगावेगळ्या आवडत्या कामांपैकी हे एक. खरं सांगू का गं, काल तुझ्यापेक्षा बाबांच्याच हातून छान झाली होती थालीपीठं. भाजाणी केप्रचीच, पण थालीपीठं मात्र मला हवी तशी मस्त कुरकुरीत....ती मउ मउ खाणं म्हणजे बोळक्या तोंडाने उगीच उम्म्म्म केल्यासारखं वाटतं, त्याऐवजी ऐटीत आगाउपणा करत,दातांचं ऐक्य मिरवत दह्यात बुडवून खाण्यात कोण आनंद असतो ठाउक आहे? आणि बाबा म्हणजे अगदी, काठालाही हलक्या दाबाने बोटं फ़िरवून, मध्येच छोटी भोकं पाडून काळजीपूर्वक पॅनवर घालत होते...कारण तुझ्या सराईतपणे फ़िरणा-या हातांची थालीपीठांना सवय त्यामुळे आज अलगद तव्यावर पडून तेलात चुरचुरणा-या त्यांच्याकडे बघून गंमत वाटली. त्यातून ती बाबा करत असताना अजूनच. नुसती थालीपीठंच नाही तर गरम गरम मुगाची खिचडी, टोमॅटो राईस, फ़ुलके ही बाबांकडे आम्ही हट्टाने केलेली मागणी.....अगदी क्वचितच करतील पण ते अगदी मन ला...

उनाडी गंमत

बरं कधीकधी सकाळी उठून मला walk ला जावसं वाटतं....रोज काय तेचतेच बघायचं?.....तोच सूर्य, तीच झाडं,तोच रस्ता मग मला बोअर होतं. सकाळ कशी......कधीतरी उठून तिचं वेगळेपण अनुभवावं,मस्त romantic वगैरे व्हावं, धुंदफ़ुंद कविता कराव्यात आणि दाट धुक्याचा झाडात साचून राहिलेला हिरवा सुवास घ्यावा,प्राजक्ताला आंजारुन-गोंजारुन घ्यावं, झुबकेदार होउन पायावर लोळणा-या उन्हाशी कुजबुजत रहावं, टवटवीत सकाळ अलगद उतरवून घ्यावी....हे सगळं करण्यात कधीतरीच मज्जा असते गं’ हे असं आउला सांगितलं तर म्हणाली, ’तुला रोज उठायचा कंटाळा येत नाही, त्याच घरी यायचा कंटाळा येत नाही हे नशीब माझं :D ’न चुकता सकाळी पाकात पिळून काढलेल्या रस्गुल्ल्यासारखं ’love you" आणि संध्याकाळी तोच रस्गुल्ला बासुंदीत बुडवून काढल्यासारखं ’miss u a lotttt' असं लाडे लाडे श्रीजा कसं बोलू शकते??? कंटाळा नाही येत रोज लाडिक बोलण्याचा तिला?’ "तुला काय problem आहे त्या बिचारीचा, बोलेनात का.....त्या बंबूलाही आवडतं नं ते मग सोड ना" ......इति कविता. हे प्रकरण नवंनवं असणार म्हणून हे असं....अशी माझी आपली आधी समजूत होती पण कविने सांगितलं हे अगं...

रात्रमयुरा..

दिवसातले गोंधळ, त्यांना दारापर्यंत निरोप देउन मी रात्रीच्या हक्काच्या जगात प्रवेश करताना कसं मोकळं मोकळं वाटतं......कित्ती दिवसांनी आउचा मोबाईल गवसला.....तिच्या नकळत उचलून आणलेला नाहीतर तिने बघितलं की हे रात्री कानात घालून मी गाण्यांच्या वरातीत होते तर तिच्या रागाचा पारा थेट वर जातो. आणि....’काढ ती कानातली टोपली(ear phone's ना याहून चांगला शब्द मी अजून शोधतेय म्हणजे तिला सांगता येईल)..दोन-दोन तास कानात अडकवून कानांच्या जवळ ठेउ नको कितीदा सांगितलंय खाजणं होतील कानाची" :O (कानाची खाजणं???) आउचा रागाचा पारा चढला की ती मराठीत गावरान सुटते....कुठल्याही अक्षरामागे कुठलंही अक्षर स्टॅंप लावून पाठवून देते...शब्द भिरभिरल्यासारखे इकडून-तिकडे पळत सुटतात. शाळेचे सुंदर, एकवळणी हस्ताक्षरातले,कौतुकं मिरवणारे अहवाल लिहीणारी ही तीच आउ का? असा मला प्रश्न पडतो. मग तिच्यासमोर मी नि विभू दाताच्या फ़टीत कोंबता येईल तितकं हसू कोंबतो आणि तिची पाठ वळायचा अवकाश खि:खी:खि:खी:.... तिच्या शब्दांची वेगळी डिक्शनरी तयार होईल’आउझ डिक्शनरी’ ( जसं चाउस तसं आउझ) :D पण आउला कुठाय ठाउक गाण्यांबरोबर माझे विचारही माझ्य...

चिरागदानं

ब्लॉग सुरु केल्यापासून, हावरट मुलासारखं मिळतील तेवढे सगळे ब्लॉग्स पाहून टाकले...वाचून झाले. एकदम आईस्क्रीम, टॉफ़ीझ,चिंचा,खेळणी एकत्र मिळाल्यावर छोटया पिल्लूचा चेहरा कसा हरखून जाईल नं तस्संच झालं. नुसते ब्लॉग्स नाहीयेत हे........ही चिरागदानं आहेत!!! चिरागदानं हा शब्द पेशवाईतला.....झुंबरांसाठी किंवा पूर्वीच्या काळी जी महाल प्रकाशित करण्यासाठी छताला लागून दिव्यांची काचेतली आरास असे त्यांना चिरागदानं म्हणतात. ही सुद्धा मनातली चिरागदानंच नाही का? मनातल्या खोल,गूढ दालनात अधांतरी पाय ठेवावा आणि नंतर ही सुबक लेणी नजरेस पडून हरखून जावं असं काहीसं झालं माझं.....मनातली सरसहून सरस शिल्पं...काही सुबक, कोरीव शब्दनशब्द टिपून घ्यावा, तर काही अगदी आकार नसलेली पण वेडुकली तरी त्यांच्याशिवाय काहीतरी रितं राहिल्यासारखं वाटावं अशी.... गायत्रीचं लेखन....श्रीमंत करुन जाणारी भाषा, शब्दांचे चकवे, अनपेक्षित हळवेपण आणि नेमक्या क्षणी उंची गाठण्याची कला...सुंदर!! टयुलिपची वर्णनात्मक ओघवती स्टाईल...तिच्या दैनंदिनीत कुठेतरी स्वत:लाच पाहिल्याचे आभास करुन देते. संवादिनी सुमेधा, मंजिरी,....असे कित्येक आणि तरी अजून मुलांच...