अवघे पंढरपूर
शुक्रवारी संध्याकाळी कॉलेजच्या दिशेने पदयात्रा चालू होती....चालता चालता कटट्याजवळ आले नि एक संभाषण कानावर पडलं हे असं पुचाट मी काही म्हणणार नाहीये कारण मी भोचकपणे,जाणूनबुजून त्यांच्या नकळत त्या संभाषणात डोकावले होते . ज्युनियर्सची धमाल गँग असावी. "सगळे आले का रे कुंभकर्णा?" इति एक लाल टीशर्ट, tall dark n (handsome च्या थोडं जवळपास जाणारी पर्सनॅलिटी). "कुठे अजून, च्या मारी ह्या पोरींच्या........पूनम आयुष्यात वेळेवर येईल तर च्यायला घडयाळच जसं काही बंद पडणारे" इति ’ विस्कटलेला एक माणूस’. "बट शी इझ स्मार्ट, काहीही म्हण." "स्मार्ट नाही, आगाउ नंबर दोन........काल भेटायला सगळ्यांनी कुठे जमायचंय हे विचारण्यासाठी फोन केला तर ही बया म्हणते, ’संध्याकाळी ये, यमुनाबाई हिर्लेकर चौकात................ दात उचकटू नकोस रे ******, for that moment मला कळलंच नाही कुठल्या चौकात बोलावतेय ती. नंतर म्हणाली अरे आपल्या रुईयाच्या नाक्यावर रे................असं म्हणून ’खि:खी: खि’ करत तुझ्यासारखेच दात उचकटले तिने नंतर. मला सांग, सरळ कॉलेजच्या नाक्यावर ये सांगता येत नाही? खरंच म्हणत...