रेन ट्रीच्या झाडांवर लांबून पाहताना लुकलुकणार्या दिव्यांसारखी दिसणारी तुर्रेदार फुलं ऐटीत झाडांच्या टोकांवर पाणदिव्यांसारखी तरंगत असल्याचा भास होतो....शिरीषाच्या झाडाची एक कमाल वाटते मला, मंद रंगाच्या गुलाबी झुपक्यांनिशी त्याच्या वेंधाळ फांद्या वार्यानिशी हलतात तेव्हा कुठे त्याची फुलं पटकन नजरेत येतात. एरवी आकर्षून घेणारा रंग,पाकळ्या असा अलंकारिक जामानिमा नसला तरी शिरीष फुलांचं असणं निव्वळ आवडतं. साने गुरुजींच्या बालकथांपैकी एका पुस्तकात शिरीषाच्या फुलांचा एक छान संदर्भ होता...तेव्हापासून आजतागायत शिरीषाच्या फुलांचं आकर्षण तस्संच आहे. त्याच्या सावलीतच बसलेल्या असतात त्या दोघी. भुर्या रंगाचा पिनाफोर आणि त्यात त्याहून जरा फिक्कट शर्ट तो ही निळीच्या रंगाने निळकट झालेला...निळसर मळकट अशीच झाक आहे त्या रंगात. त्यांच्या रंगात बेमालूम मिसळून गेलेली. भुरकट केसांच्या घट्ट वेण्यांना काळ्या रिबीनी आणि फुलपाखरी पेड. एक जराशी सावळी दुसरी गव्हाळ. भेळेच्या पुडक्यात एकच ओलसर पुरी बुडवून खात, खिदळत त्यांची दुपार सटकते. एकाच शाळेतल्या-आळीतल्या मैत्रिणी..,दोघी शाळा सुटल्यानंतर ठराविक घरातली दुपारची काम...
Posts
तात्या
- Get link
- X
- Other Apps
आज्यो...बाssss', आज्योssबा’ कितीतरी वेळ आज्यो मधल्या ’ज्यो’ वर एक इनोसन्ट गिरकी घेत माझ्या अगदी समोर उभ्या असलेल्या माणसाच्या खांद्यावर त्याचं आजोबा पुराण चाललेलं. ठेक्यात चार पाच वेळा त्याच्याकडून आबोजा-बिबोजा असं कौतुक करुन घेतल्यावर आजोबानेही कपाळावरचा घाम पुसला. बराच वेळ त्याच्याकडे बघत बसल्यावर नंतर मलाही गरम व्हायला लागलं. ’काय पण जागा मिळालीये गुंफा बांधायला...’टेकडीवर चढून बांधायची ना..’ असा माझा मूक वैताग चाललेला. गुंफा बांधायच्या, म्हणजे फक्त बांधून ठेवायच्या...डागडुजी करण्याच्या नावाने बोंब..पलीकडे ताटाएवढ्या भोकातून गळती सुरु, वावर नाही तिथे शेवाळं हौसेने वाढलेलं...नवरात्र, महाशिवरात्रीला हीssssss गर्दी. ’पुष्कळ जुन्या म्हणजे २००-३०० वर्ष जुन्या असतील नाही का’...कुणी म्हणायचा अवकाश लोकांचं पुढचं वाक्य असतं’ पांडवकालीन’ आहेत’.. ????????? २००-३०० वर्ष जुन्या पांडवकालीन कशा असतील.... बरं असल्याच तर पांडव इथे राहून गेले म्हणून प्लीज सांगू नका...जिथे जावं तिथे हेच ऐकावं पांडव अज्ञातवासात असताना इथे होते......अर्रे....याला काहीतरी प्रमाण? असं विचारायला जावं तर पुढचं उत्त...
बाल्कनी : २
- Get link
- X
- Other Apps
गजा काकू म्हणजे ठेवल्या नावाला वजनानिशी जागणारी बाई! काकूंची दृष्टी अलौकिक, गजाआडच्या सृष्टीचा अंदाज घेणारी. "बाल्कन्यांवर भारी नजर या बाईची, नवीन साडी आणून वाळत घालायची खोटी..यांना कळलंच!" इति नवरत्ने. "इतनीभी बुरी नहीं है गजाजी।" इति सोनी. (सोनींना सोसायटी आणि सोसायटीला सोनी नवख्या होत्या त्या काळापासूनची त्यांची गजाकाकू ही मैत्रिण. त्यामुळे तसा त्यांचा काकूंबाबतीत सॉफ्ट कॉर्नर होता.) "मामींचं नाक काय तीक्ष्ण आहे हो..परवा मी हे टूरवर जाणार म्हणून कडबोळ्या करायला घेतल्या, आपसूक बातमी लागल्यासारख्या ह्या आल्या..म्हणे शिल्पे खमंग वास येतोय बाल्कनीतून. आज काय निलेशराव स्पेशल वाटतं..., मग रेसिपी लिहून घेउन, चार टेस्ट करण्यासाठी म्हणून घेउन गेल्या. खूप छान झाल्यायत म्हणाल्या." शिल्पा-निलेश सोसा.तलं नवदाम्पत्य..शिल्पा त्यांना आवर्जून मामी म्हणते.(अजूनही). "सुनंदे, मेले डोळे आहेत की फुंकणी? जाळ काढशील बघता बघता..." इति बेळगावची म्हातारी. तिला एकटीलाच फक्त काकूंना अशा प्रकारे बोलण्याची सवलत होती. त्यामागचं गुपित-गोटाकडून कळलेलं कारण म्हणजे..बेळगावच्या उ...
बाल्कनी : १
- Get link
- X
- Other Apps
’बाल्कनी’ म्हणजे बाल्कनी ! बैठ्या सोसायटयांमधल्या घरकर्यांचा जीव की प्राण, म्हणजे जीव गेला तरी प्राण बाल्कनीत शिल्लक असं काहीसं बाल्कनी उर्फ गॅलरीचं पूर्वीचं ग्लॅमर. त्यातली मानाच्या गणपतीसारखी ’मानाची गॅलरी’ म्हणजे ’डी’च्या रुमची गॅलरी. ऐसपैस, मोकळीढाकळी सेम सोसायटीतल्या बायकांसारखी. तशी सोसायटीतल्या प्रत्येक घराला बाल्कनी, पण ती पुढे-मागे असण्यातली गोम फक्त सोसायटीकरांनाच ठाउक. हाउसफुल्ल शो चं तिकीट काढताना नाटक आणि सिनेमा यातली गल्लत बराच काळ चुटपुट लावू शकते तशीच जागा घेताना बाल्कनी पुढे-मागे असण्याचं महत्त्व लक्षात घेतलं नाही तर आयुष्यभराची खंत गॅलरीत पुरून जगावं लागतं. बाल्कनीच्या घराचं प्रेस्टीज फार...म्हणजे ’विवाह नोंदणी कार्यालयाने ’मुलगा स्वतंत्र नाही पण राहत्या घराच्या बेडरुम सेपरेट’ अशी’ आकर्षक’ ऍड द्यावी तसं सोसायटीकरांनी उपवर मुलीच्या पित्याला ’आमची ’डी’ची रुम, विथ अटॅच्ड बाल्कनी/बाल्कनी अटॅच्ड’ असं सांगून उपकृत करावं. गॅलरीवर लोकांचं असं प्रेम!! एवढं की शेलाटेंसारख्या अभिमानी मध्यमवर्गीय माणसाने संपूर्ण आयुष्यच गॅलरीत ’संगणकी शिकवण्या’ घेत वेचलं. तर सांगायची गोष्ट ही की...
देठाफुलाची गोष्ट
- Get link
- X
- Other Apps
आमचा विभू म्हणजे अगदी छोटं छोटं गोरंपान बाळ होतं तेव्हा... त्याला मांडीवर घेउन गप्पा चालल्या होत्या आमच्या, म्हणजे त्याला फक्त ही ही हु हु, आणि फारतर फार जोरात रडता येत होतं, आणि मला एखाददुसरी अंगाई म्हणता(ऐकवेल इतपत गोड आणि गायला सुरु करायचा अवकाश फार काळ अंत न बघता त्याला पटकन गुडुप्प झोप येईल अशी) येत होती. त्याचा बोलण्यासाठी प्रयत्न मात्र सुरु झाला होता. काहीतरी बघून खुद्कन हसण्याचेही खेळ चालले होते. अचानक त्याच्या तोंडून बोबडी हाक ऐकली....आणि दोन सेकंद कानांवर विश्वासच बसेना. तश्शीच टुण्णकन उडी मारुन धावत आईला सांगायला गेले. "आई, विभूने हाक मारली ती ही माझं नाव घेउन, hehhe ’आई’ म्हटलंच नाही आधी त्याने..टुकटुक..मज्जा." आईलाही ऐकून गंमत वाटली होती. आम्ही म्हणजे काय आसमंतातच....कुणी अभ्यास बिभ्यास न करता डॉक्टरेट दिल्यासारखा आनंद झाला होता. आपण काय म्हटलं हे त्याला कळण्याची सोयच नव्हती. तो आपला मस्त सतरंजीचं एक टोक तोंडात पकडून माझ्याकडे पाहून हसत होता. यानंतर एक आठ नउ वर्षांनी..... . . . . आमची नेहमीसारखीच उतास जाईल इतकी वादावादी ऐकून आई वैतागली होती. "काय चाललंय तु...
- Get link
- X
- Other Apps
सकाळी भरभर कामं उरकून आई घराबाहेर पडली, तिच्या जाण्याच्या वेळा हल्ली हल्लीच अनिश्चित व्हायला लागल्या. घरातली सगळी कामं उरकता उरकता दमछाक होणं हा काय प्रकार असू शकतो ते घरात स्वत: बिनकामाचे पडलेलो असल्याशिवाय कळण्याचा प्रश्नच उद्भवत नसतो. एरवी कॉलेजची बॅग लटकवून मी आणि नंतर शाळेचं ओझं घेउन विभू घरातून बाहेर पडतो, आपल्याच विश्वात रममाण होण्यासाठी. मागे उरते फक्त आई......घराबाहेरचं आपलं असं एक रुटीन सुरु झालं की आपल्या मागे घरी उरणा-या माणसाच्या कामाबद्दल फक्त कल्पना केल्या जाउ शकतात किंवा अंदाज बांधले जाउ शकतात. म्हणजे शेव-पुरी,पाव-भाजी किंवा पिझ्झा असे नॉट सो कॉमन मेन्यू संध्याकाळच्या जेवणात मेन आणि फायनल लिस्टवर असतील तर त्याच्या तयारीपासून अर्थात सगळ्या गोष्टी तीच करते( कारण मला वेळ नसतो, घरी असले तरी इतर बर्रीच कामं म्हणजे.. ऑरकुटींग-टॉरकुटींग...कालच भेटून झालेलं असलं तरी आज कमीत कमी १५ मिनीटं फोनवर मारण्यासाठी विषय असू शकतात इ. इ. ). ती मात्र तिच्या कामाशी १००% डेडीकेटेड असू शकते कधीही,केव्हाही......थोडक्यात आई ही ग्रेटच असते. :) मास्टर्स च्या ऍडमिशनमुळे या सगळ्या रुटीनमध्ये एक खंड ...
- Get link
- X
- Other Apps
रोज काही नवीननवीन(त्याही चांगल्या) पोस्टस सुचत नाहीत...पण तरीही काहीतरी लिहावंसं वाटतं, रोज घडेल ते सगळंच इंटरेस्टींग नसलं तरीही.....म्हणून एक नवीन ब्लॉग सुरु केला. अर्थात त्यामागची आयडिया/ कल्पना ही इतर ब्लॉग्स पाहूनच सुचली..अमलात आणावीशी वाटली. तेव्हा सर्किट, कोहम, जास्वंदी यांना थॅक्स :) http://sadaaphuli.blogspot.com/