सकाळी भरभर कामं उरकून आई घराबाहेर पडली, तिच्या जाण्याच्या वेळा हल्ली हल्लीच अनिश्चित व्हायला लागल्या. घरातली सगळी कामं उरकता उरकता दमछाक होणं हा काय प्रकार असू शकतो ते घरात स्वत: बिनकामाचे पडलेलो असल्याशिवाय कळण्याचा प्रश्नच उद्भवत नसतो. एरवी कॉलेजची बॅग लटकवून मी आणि नंतर शाळेचं ओझं घेउन विभू घरातून बाहेर पडतो, आपल्याच विश्वात रममाण होण्यासाठी. मागे उरते फक्त आई......घराबाहेरचं आपलं असं एक रुटीन सुरु झालं की आपल्या मागे घरी उरणा-या माणसाच्या कामाबद्दल फक्त कल्पना केल्या जाउ शकतात किंवा अंदाज बांधले जाउ शकतात. म्हणजे शेव-पुरी,पाव-भाजी किंवा पिझ्झा असे नॉट सो कॉमन मेन्यू संध्याकाळच्या जेवणात मेन आणि फायनल लिस्टवर असतील तर त्याच्या तयारीपासून अर्थात सगळ्या गोष्टी तीच करते( कारण मला वेळ नसतो, घरी असले तरी इतर बर्रीच कामं म्हणजे.. ऑरकुटींग-टॉरकुटींग...कालच भेटून झालेलं असलं तरी आज कमीत कमी १५ मिनीटं फोनवर मारण्यासाठी विषय असू शकतात इ. इ. ). ती मात्र तिच्या कामाशी १००% डेडीकेटेड असू शकते कधीही,केव्हाही......थोडक्यात आई ही ग्रेटच असते. :) मास्टर्स च्या ऍडमिशनमुळे या सगळ्या रुटीनमध्ये एक खंड
Posts
Showing posts from July, 2009
- Get link
- X
- Other Apps
रोज काही नवीननवीन(त्याही चांगल्या) पोस्टस सुचत नाहीत...पण तरीही काहीतरी लिहावंसं वाटतं, रोज घडेल ते सगळंच इंटरेस्टींग नसलं तरीही.....म्हणून एक नवीन ब्लॉग सुरु केला. अर्थात त्यामागची आयडिया/ कल्पना ही इतर ब्लॉग्स पाहूनच सुचली..अमलात आणावीशी वाटली. तेव्हा सर्किट, कोहम, जास्वंदी यांना थॅक्स :) http://sadaaphuli.blogspot.com/