रेन ट्रीच्या झाडांवर लांबून पाहताना लुकलुकणार्या दिव्यांसारखी दिसणारी तुर्रेदार फुलं ऐटीत झाडांच्या टोकांवर पाणदिव्यांसारखी तरंगत असल्याचा भास होतो....शिरीषाच्या झाडाची एक कमाल वाटते मला, मंद रंगाच्या गुलाबी झुपक्यांनिशी त्याच्या वेंधाळ फांद्या वार्यानिशी हलतात तेव्हा कुठे त्याची फुलं पटकन नजरेत येतात. एरवी आकर्षून घेणारा रंग,पाकळ्या असा अलंकारिक जामानिमा नसला तरी शिरीष फुलांचं असणं निव्वळ आवडतं. साने गुरुजींच्या बालकथांपैकी एका पुस्तकात शिरीषाच्या फुलांचा एक छान संदर्भ होता...तेव्हापासून आजतागायत शिरीषाच्या फुलांचं आकर्षण तस्संच आहे. त्याच्या सावलीतच बसलेल्या असतात त्या दोघी. भुर्या रंगाचा पिनाफोर आणि त्यात त्याहून जरा फिक्कट शर्ट तो ही निळीच्या रंगाने निळकट झालेला...निळसर मळकट अशीच झाक आहे त्या रंगात. त्यांच्या रंगात बेमालूम मिसळून गेलेली. भुरकट केसांच्या घट्ट वेण्यांना काळ्या रिबीनी आणि फुलपाखरी पेड. एक जराशी सावळी दुसरी गव्हाळ. भेळेच्या पुडक्यात एकच ओलसर पुरी बुडवून खात, खिदळत त्यांची दुपार सटकते. एकाच शाळेतल्या-आळीतल्या मैत्रिणी..,दोघी शाळा सुटल्यानंतर ठराविक घरातली दुपारची काम...
Posts
Showing posts from October, 2009