प्रिय आउस,
प्रिय आउस, "काल महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुझ्या हातची खमंग थालीपीठं खायला मिळतील.....अशाच खुशीत आणि किचनमधून येणा-या वासासरशी मांजरीचं नाक लावून आत गेले आणि पाहिलं.....बाबा थालीपीठं करतायत आणि तू बाहेर.....फ़ायलिंग करत बसली होतीस तुझ्या जगावेगळ्या आवडत्या कामांपैकी हे एक. खरं सांगू का गं, काल तुझ्यापेक्षा बाबांच्याच हातून छान झाली होती थालीपीठं. भाजाणी केप्रचीच, पण थालीपीठं मात्र मला हवी तशी मस्त कुरकुरीत....ती मउ मउ खाणं म्हणजे बोळक्या तोंडाने उगीच उम्म्म्म केल्यासारखं वाटतं, त्याऐवजी ऐटीत आगाउपणा करत,दातांचं ऐक्य मिरवत दह्यात बुडवून खाण्यात कोण आनंद असतो ठाउक आहे? आणि बाबा म्हणजे अगदी, काठालाही हलक्या दाबाने बोटं फ़िरवून, मध्येच छोटी भोकं पाडून काळजीपूर्वक पॅनवर घालत होते...कारण तुझ्या सराईतपणे फ़िरणा-या हातांची थालीपीठांना सवय त्यामुळे आज अलगद तव्यावर पडून तेलात चुरचुरणा-या त्यांच्याकडे बघून गंमत वाटली. त्यातून ती बाबा करत असताना अजूनच. नुसती थालीपीठंच नाही तर गरम गरम मुगाची खिचडी, टोमॅटो राईस, फ़ुलके ही बाबांकडे आम्ही हट्टाने केलेली मागणी.....अगदी क्वचितच करतील पण ते अगदी मन ला...